आपला जिल्हा

जिल्हा निर्मितीपासून वीज, रस्ते, शिक्षण, आरोग्य क्षेत्रात भरीव कामगिरी – जिल्हाधिकारी संजय मीणा

जिल्हा कार्यालयात स्वातंत्र्य दिन साजरा

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि १६ ऑगस्ट

जिल्हा निर्मितीपासून वीज, रस्ते, शिक्षण, आरोग्य याबाबत अमुलाग्र बदल झाले असून दुर्गम, अतिदुर्गम भागातील नागरिकांना आरोग्य व शिक्षण सुविधा अजून चांगल्या प्रकारे देण्यासाठी प्रशासन काम करीत आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी ध्वजारोहण कार्यक्रमावेळी केले. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त मुसळधार पावसात जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला.

राष्ट्रीय एकता आणि अखंडता अबाधित रहावी, तसेच एकीकृत मजबूत भारताच्या मूल्यांचे संवर्धन व्हावे, यासाठी आपणही योगदान देण्यासाठी संकल्प करूया असे आवाहनही जिल्हाधिकारी मीना यांनी यावेळी केले. या ध्वजारोहण प्रसंगावेळी आमदार डॉ. देवराव होळी, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कुमार आशिर्वाद, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

जिल्हाधिकारी संजय मीना पुढे म्हणाले की आतापर्यंत जिल्ह्याने बरीच प्रगती केली असून मोबाईल नेटवर्क ची समस्या दूर करण्यासाठी नुकतेच जिल्ह्यात खाजगी कंपन्यांकडून ५०० हून अधिक नवीन मोबाईल टावर उभारण्यात येणार आहेत. यापुर्वी सर्व तालुक्यात शासकीय कार्यालये इंटरनेटने जोडली गेली आहेत. जिल्ह्यात रेल्वे मार्गाचे काम लवकरच सुरू होत आहे. मेडिकल कॉलेजही सुरू करण्यास शासनाची मान्यता मिळाली असून गोंडवाना विद्यापीठाचे विस्तारीकरण करण्यात आले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक युवकाला जिल्हयातच शिक्षण व उद्दोगाच्या सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी प्रशासन योजना राबवित आहे.

विविध क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी केलेल्यांचा गौरव

यात सेवानिवृत्त परिसेविका शालीनी नाजुकराव कुमरे, राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेते तथा जि.प. उच्च प्राथमिक शाळा, असरअल्ली येथील शिक्षक खुर्शीद कुतुबुद्दीन शेख, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते देवाजी तोफा, नानाजी वाढई, आपत्ती व्यवस्थापन सल्लागार कृष्णा रेड्डी, गडचिरोली पाटबंधारे विभागातील कार्यकारी अभियंता प्रकाश गायकवाड, आरेखक पाटबंधारे विभाग गडचिरोली गोपीचंद गव्हारे, सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंता ङि जी. कोहळे, कुरखेडा तालुका कृषि अधिकारी सुरभी राजेंद्र बावीस्कर तसेच सर्वोत्कृष्ठ ग्रामपंचायत भामरागड तालुक्यातील मन्नेराजाराम, इरकडूम्मे, जिल्हास्तरावरील सर्वोत्कृष्ठ तालुका भामरागड व आरमोरी तसेच  जिल्हास्तरावरील सर्वोत्कृष्ट क्लस्टर, वैरागड- मानापूर आर.एच.ई राकेश चलाख, इतर राज्य योजना पुरस्कार जिल्हास्तरावरील सर्वोत्कृष्ठ क्लस्टर, बेडगाव-कोटगुल आर.एच.ई प्रमोद मेश्राम यांना प्रशस्तीपत्र व मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

७५ फूट ध्वजाची उभारणी

गडचिरोली जिल्ह्यात प्रथमच ७५ फूट उंच ध्वजाची उभारणी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील नियोजन भवन समोर करण्यात आली. या ठिकाणचा ध्वज मुख्य कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी संजय मीणा व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत वरती घेण्यात आला. उभारणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागातील अधीक्षक अभियंता नीता ठाकरे, कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली इतर अभियंत्यांनी तातडीने काम पूर्ण करून ध्वजाची उभारणी केली.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!