स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आरमोरीत तिरंगा रॅली

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि १२ ऑगस्ट
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रम आयोजित केले असून आरमोरी नगर परिषदेच्या वतीने घोषवाक्याच्या निनादात भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅलीत अनेक शाळेच्या विद्यार्थी-विद्यार्थींनी महात्मा गांधी, शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, जिजाबाई, भगतसिंग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राणी लक्ष्मीबाई यांच्या वेशभूषा करून रॅलीत सहभाग घेतला. त्यामुळे ते या रॅलीचे खरे आकर्षण बनले होते.
आरमोरी न.प.चे नगराध्यक्ष पवन नारनवरे, उपाध्यक्ष हैदर पंजवानी, आरमोरीचे तहसीलदार कल्याण कुमार डहाट, मुख्याधिकारी डॉ. माधुरी सलामे, आरोग्य सभापती भारत बावनथडे यांनी हिरवी झेंडी दाखवून तिरंगा रॅलीची सुरुवात केली. ‘भारत माता की जय ‘वंदे मातरम’ च्या जयघोषात ही रॅली नगर परिषदेपासून सुरुवात करण्यात येऊन राष्ट्रीय महामार्गाच्या मुख्य रस्त्यावरून काढण्यात येऊन या रॅलीची सांगता आरमोरी येथील हितकारणी शाळेच्या क्रीडा संकुल मैदानात राष्ट्रगीताने करण्यात आली. रॅलीचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे या रॅलीत
या रॅलीत आरमोरी शहरातील आरमोरी पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी चेतन हिवंज, ठाणेदार मनोज काळबांडे, गटशिक्षणाधिकारी नरेंद्र कुमार कोकुडे, नगरपरिषद प्राचार्य पाचपांडे, प्राचार्य अद्दलवार, प्राचार्य केशवन कवंडर, प्राचार्य वठे, शेंडे, महिला व बालकल्याण सभापती सुनीता चांदेवार, बांधकाम सभापती सागर मने, पाणीपुरवठा सभापती विलास पारधी, पं. स. चे माजी उपसभापती चंदू वडपल्लीवार, सहाय्यक संवर्ग विकास अधिकारी राजकुमार पारधी, तालुका होमगार्ड समादेशक अनिल सोमनकार, पत्रकार रुपेश गजपुरे, विलास चिलबुले, विस्तार अधिकारी सलामे, मडावी, नगरसेविका सुनीता मने, गीता सेलोकर, प्रगती नरनवरे, सिंधू कापकर, उषा बारसागडे, कीर्ती पत्रे, निर्मला किरमे, पतंजली योग्य समितीचे सत्यनारायण चकिनारपवार, तसेच आरमोरी येथील प्रतिष्ठित नागरिक, पोलीस स्टेशन आरमोरी येथील सर्व पोलीस कर्मचारी, आरमोरी शहरातील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस, होमगार्ड पथकातील सर्व होमगार्ड, सर्व शाळेचे प्राचार्य- शिक्षक वृंद, आरमोरी शहरातील सर्व जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका व शिक्षक वृंद, आरमोरी पंचायत समिती व तहसील कार्यालय येथील कर्मचारी वृंद, नगरपरिषद चे सर्व कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.