आपला जिल्हा
ॲड. कविता मोहरकर ‘ शेड्स ‘ मासिकाच्या मुखपृष्ठावर

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि १० ऑगस्ट
गडचिरोली येथील प्रसिद्ध वकील व सामाजिक सेविका ॲड कविता मोहरकर यांची ‘ शेड्स ‘ मासिकाच्या मुखपृष्ठासाठी निवड झाली आहे.
ॲड. मोहरकर यांनी नुकतेच विश्वसुंदरी चा खिताब जिंकला असून त्यांना विश्वसुंदरी -२०२१ चा मुकुट प्राप्त झालेला आहे. साऊथ कोरियाची राजधानी सोल येथे सदर आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ॲड. मोहरकर यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते. सौन्दर्य स्पर्धेच्या अनेक स्पर्धेमध्ये त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये विजेतेपद प्राप्त केलेले आहे. त्या यापूर्वी ‘ फॅशन लाईफस्टाईल मॅगझिन’ च्या ब्रांड ॲम्बेसेडर होत्या.बंगलोर वरून प्रसिध्द होणाऱ्या अतिशय ख्यातनाम ‘ शेड्स ‘ मासिकाच्या मुखपृष्ठावर निवड झाली असल्यामुळे आनंद व्यक्त केला जात आहे.