कुरखेड्यातून काँग्रेसच्या आझादी गौरव पदयात्रेची सुरुवात

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि ०९ ऑगस्ट
स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांत काँग्रेस पक्षाने देशाला उभे करण्यासाठी जे योगदान दिले, ते लोकांपुढे मांडण्यासाठी कॉंग्रेस पक्षाकडून कुरखेड्यातून आझादी गौरव पदयात्रेचा सुरुवात करण्यात आली. ही यात्रा १५ ऑगस्टपर्यंत चालणार असून कुरखेडा ते गडचिरोली हा ७५ किमीचा मार्ग निश्चित करण्यात आला.
संपूर्ण देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. त्यामुळे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने स्वातंत्र्याचा गौरवशाली इतिहास लोकांसमोर मांडण्यासाठी आणि स्वातंत्र्य चळवळीतील स्वातंत्र्य संग्राम सैनिकांना स्मरण करण्यासाठी आझादी गौरव पदयात्रा काढण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वात जिल्हा काँग्रेस कमिटी व कुरखेडा तालुका काँग्रेस पार्टी यांच्या वतीने पदयात्रेचे आयोजित केले आहे. दररोज १२ किमी पायी चालल्यानंतर वाटेतीलच एखाद्या गावात मुक्काम करण्यात येईल. यादरम्यान ठिकठिकाणी सभाही होणार आहेत. तसेच भाजपच्या काळात वाढलेली महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, इडीसारख्या स्वायत्त संस्थांचा अनिबंध व सूडबुद्धीने वापर अशा अनेक बाबींची माहितीही देण्यात येणार आहे.
यावेळी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, प्रदेश महासचिव डॉ. नामदेव किरसान, शहराध्यक्ष सतीश विधाते, अनुसूचित जाती विभागाचे रजनीकांत मोटघरे, परशराम टिकले, दामदेव मंडलवार, नंदू वाईलकर अनिल कोठारे, रमेश चौधरी, हरबाजी मोरे, भैय्याजी मुद्दमवार, सुरेश भांडेकर, निसार, ढिवरू मेश्राम, दीपक मडके, मिलिंद खोब्रागडे, प्रभाकर तुलावी आदी उपस्थित होते.