पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि ०६ ऑगस्ट
गुरे चारण्यासाठी गेलेल्या ६५ वर्षीय इसमावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना शनिवारी गडचिरोली मुख्यालयापासून ७ किलोमीटर अंतरावरील बोदली गावाजवळी जंगल परिसरात घडली. मारोती पिपरे रा. बोदली असे मृतकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, मृतक इसम हा स्वतःची जनावरे घेऊन गावाजवळील झुडपी जंगलामध्ये चारण्यासाठी गेलाअसता दबा धरून बसलेल्या वाघाने त्याचेवर हल्ला केला. यात त्याचा जागीच मृत्य झाला.संध्याकाळी जनावरे परत आली मात्र इसम परत आला नसल्याने गावकऱ्यांनी जंगलात शोध घेतला असता तो गावाजवळील तलावाजवळ मृतावस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी व पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी गडचिरोली सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला.
मागील काही दिवसापासून वाघाचे हल्ले वाढले असून महिनाभरात वाघाने चार जणांना ठार केले आहे. त्यामुळे वाघाचा वावर असलेल्या जंगल परिसरात नागरिकांनी जाऊ नये असे आवाहन वनविभागाने केले आहे.