सावली तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी असोलामेंढा प्रकल्पाचे पाणी सोडा ; खासदार अशोक नेते यांचे निर्देश

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि ०२ ऑगस्ट
चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यात रोवणीची कामे जोमात सुरु आहे. मात्र चार -पाच दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने रोवणीचे कामे थांबली आहेत. त्यामुळे असोलामेंढा प्रकल्पाचे पाणी सोडावे असे निर्देश खासदार अशोक नेते यांनी प्रकल्पाचे मुख्य अभियंता सोनुणे दिले आहे.
तालुक्यात चार -पाच दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतीच्या बांधावर रोवण्याकरिता पाणी नाही. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत होता. हीबाब दिवाकर गेडाम यांनी या क्षेत्राचे खासदार अशोकनेते यांना लक्षात आणून दिल्यानंतर असोलामेंढा प्रकल्पाचे मुख्य अभियंता सोनुणे यांना खासदारांनी फोन करुन लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या रोवणीसाठी पाणी सोडा असे सूचना केले. दुरुस्तीचे काम सुरु असल्याने दोन-तीन दिवसात पाणी सोडले जाईल. त्यापुर्वी तालुक्याच्या विभागामध्ये पाणी वापर संस्थेने मागणी अर्ज करावे त्यानंतर दोन दिवसात पाणी सोडण्यात येईल असे मुख्य अभियंत्यांनी सांगितले.