पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि ३० जुलै
आरमोरी पोलीस स्टेशन हद्दीतील पालोरा-जोगीसाखरा मार्गावर शनिवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास एका ट्रकच्या केबिनमध्ये एका इसमाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सुधाकर कारुजी पुडके (४१) असे मृतकाचे नाव असून तो चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्यातील फुटाणा येथील रहिवासी आहे. सदर मृतक अल्ट्राटेक सिमेंट कंपनी आवारपूर येथे ट्रक चालक म्हणून काम करीत होता.
पालोरा-जोगीसाखरा या मार्गावर उभ्या असलेल्या एमएच ३४ एम ४८८२ क्रमांकाच्या ट्रक च्या केबिनमध्ये एक मृतदेह असल्याची माहिती आरमोरी पोलिसांना मिळाली असता आरमोरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार मनोज काळबांडे यांनी चमुसह घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. व मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदनानंतरच कळणार आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक मनोज काळबांधे यांच्या मार्गदर्शनात सहा.फौ. गौतम चिकनकर करीत आहे.