पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि ३१ जानेवारी
तळोधी (कुनघाडा) येथील रामभाऊ पैकाजी मानापुरे यांचे मंगळवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. ते चामोर्शी पंचायत समितीचे माजी सभापती तथा तळोधी ग्रामपंचायतचे माजी सरपंच होते. त्यांचे पश्चात दोन मुले व दोन मुली,जैन कलार समाजाचे सक्रिय कार्यकर्ते प्रदीप रणदिवे हे जावई, नातवंड यांसह बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांचे पार्थिवावर आज मंगळवारी दुपारी दोन वाजता तळोधी येथे तळोधी येथे अंतिम संस्कार केले जाणार आहेत होणार आहे. त्यांच्या निधनाने चामोर्शी तालुक्यातील एक राजकीय मार्गदर्शक हरपला अशी शोक संवेदना व्यक्त केली आहे