८० हजाराची लाच स्वीकारतांना लाचखोर हवालदार एसीबीच्या जाळ्यात
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि २८ जुलै
दारूची अवैध वाहतूक करण्यासाठी ८० हजारांची लाच स्वीकारतांना गडचिरोलीतील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय प्राणहिता, अहेरी येथील एका हवालदाराला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. मनोज कुनघाडकर असे या लाचखोर पोलिस हवालदाराचे नाव आहे. विशेष म्हणजे सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात करण्यात आली.
तेलंगाना राज्यातून भामरागड येथे अवैध दारूची वाहतूक करण्यासाठी हवालदार मनोज कुनघाडकर याने तक्रारदाराकडून हप्ता म्हणून १ लाख रुपयाची मागणी केली. तडजोडीअंती हवालदाराने ८० हजार रुपये घेण्याचे ठरवले. मात्र लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. एसीबी च्या चमूने सापळा रचत लाचखोर हवालदारास उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात अटक करण्यात आली. याप्रकरणी गडचिरोली लाचलुचपत विभागाकडून तपास सुरु असून या कार्यवाईमुळे लाचखोरअधिकाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.