राष्ट्रीय महामार्गावर पाच तास चक्काजाम आंदोलन करुन राज्य व केंद्र सरकारचे वेधले लक्ष

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. १० नोव्हेंबर
अहेरी-सिरोंचा ५३५ सी या महामार्गाची दुरवस्था झाली असून मार्गावर मोठं मोठे खड्डे कधी बुजविणार असा प्रश्न उपस्थित करीत काल ९ नोव्हेंबर रोजी सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांच्या नेतृत्वात सकाळी ७ वाजता समस्याग्रस्त नागरिकांना घेऊन चक्काजाम आंदोलनाला केले. या वेळी परिसरातील असंख्य नागरीकानी ठिय्या दिला. सदर आंदोलन जवळ जवळ पाच तास सुरू होते. राष्ट्रीय महामार्गाचे काम प्रारंभ करण्याचे लेखी आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिल्याने पोलीस विभागाच्या मध्यस्थीने आंदोलन मागे घेण्यात आले.
आलापली ते सिरोंचा महामार्गाचे काम तात्काळ सुरू करणे, वनहक्क धारकांना कायमस्वरूपी पट्टे देणे, गृह
चौकशी करून जात प्रमाणपत्र देणे, छल्लेवाडा स्वतंत्र ग्राम पंचायत घोषित करणे अशा विविध मागण्या घेऊन रेपनपली येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. महामार्गाशी संबंधित अधिकाऱ्यांनी भेट देऊन चर्चेअंती १६ नोव्हेंबर पासून रस्ता बांधकाम सुरू करण्याचे लेखी स्वरूपात हमी दिले. उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मध्यस्थीने आंदोलन मागे घेण्यात आले. या वेळी जिमलगठ्ठा चेउपविभागीय पोलीस अधिकारी सुजित क्षीरसागर, रेपनपली चे पोलिस निरीक्षक गोविंद कटिंग,वनपरिक्षेत्र अधिकारी रेपणपली खरतड, वनपरिक्षेत्र अधिकारी चौके, रामजीत यादव महामार्ग तपासणी अधिकारी, वैद्य असिस्टंट इंजिनियर, शैलेंद्रसिंग यादव कंत्राटदार, कैलास सताळे यांनी आंदोलनास भेट देऊन समस्यांवर चर्चा घडवून आणल्या.
या प्रसंगी संतोष ताटीकोंडावार सामाजिक कार्यकर्ते, प्रफुल नागुलवार उपसरपंच तिमरम, रजनीता मडावी माजी सरपंच कमलापूर, सुनील रत्नम, योगेश कोतकोंडावार, प्रभादेवी येजुलवार आदी शेतकरी बांधव व गुड्डीगुडम, निमलगुडम, कमलापूर, छलेवाडा, रेपणपली, राजाराम तिमरम येथील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.