पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि २२ जुलै
अवैधरीत्या दारू आणून घरूनच दारू विक्री करणाऱ्या ७ जणांना मागील पाच दिवसात विविध ठिकाणावरून गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. या कारवाईत एकूण १ लाख ९ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे दारूविक्रेत्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
घनश्याम मडावी रा. मसली ता. गडचिरोली, रोशन मधुकर कुंभारे रा. इदाळा टोली, परीक्षीत जितेंद्र पाल रा. कॉम्प्लेक्स गडचिरोली, आशा गणेश आंबटकर रा. लांझेडा, राजेश्वर नामदेव ओगेवार रा. इंदाळा, कैलाश यशवंत पुराम रा. गोकुलनगर असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहेत. गडचिरोली पोलिसांनी अवैध दारू विक्रेत्याविरोधात धाडसत्र सुरु केले असून अटक करण्यात आलेल्या ७ आरोपींकडून देशी दारू, हातभट्टी असे एकूण १,०९,२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.