आपला जिल्हा

विजेचा शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू 

महावितरणचा निष्काळजीपणा बेतला शेतकऱ्याच्या जीवावर ; गोंडपिपरी तालुक्यातील घटना

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क चंद्रपूर दि १६ जुलै

शेतात तुटून पडलेल्या जिवंत विद्युत ताराच्या स्पर्शामुळे एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील सकमुर (चेकबापूर) येथे शनिवारी दुपारच्या सुमारास घडली. राजेश्वर तोहगावकर (५५) असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.

गेल्या दीड दोन महिन्यापासून वादळामुळे सकमुर येथील शेतातील काही विद्युत खांब कोसळले होते. त्याची तक्रार व माहिती शेतकऱ्यांनी महावितरण विभागाला दिली. त्यांनी विद्युत पुरवठा खंडीत केला पण दोन महिने लोटूनदेखील खांब उभे केले नाही. तुटलेल्या तारांची विल्हेवाट लावली नाही. नेहमीप्रमाणे राजेश्वर आपल्या शेतात जात असताना विद्युत तारांना स्पर्श झाला व तो तारावरच कोसळला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

महावितरण विभागाने वेळेत खांब उभे केले असते तर राजेश्वर यांचा जीव गेला नसता. त्यामुळे आपल्या कर्तव्यात निष्काळजी करणाऱ्या  अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी व कुटुंबियांना आर्थिक मदत करावी अशी मागणी ग्राम पंचायत सदस्य अशोक रेचनकर यांच्यासह गावकऱ्यांनी केली आहे. महावितरण चे अधिकारी घटनास्थळी आल्याशिवाय प्रेत उचलणार नाही अशी भूमिका कुटुंबियांनी घेतली आहे. राजेश्वर तोहगावकर यांच्या पश्चात दोन मुले, पत्नी असून तोहगावकर कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!