माविम येथील जिल्हा समन्वय अधिकारी सचिन देवतळे यांना आचार्य पदवी

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि १५ जुलै
गडचिरोली येथील महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), येथे जिल्हा समन्वय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले सचिन देवतळे यांना नुकतेच आचार्य पदवी (पी. एच डी.) बहाल करण्यात आली.
सचिन देवतळे यांनी आठवले कॉलेज ऑफ सोशल वर्क भंडारा येथील डॉ. नरेश एस. कोलते यांच्या मार्गदर्शनात “तेजस्विनी कार्यक्रमा अंतर्गत असलेल्या स्वयंसहायता महिला बचत गटातील महिलांचे आर्थिक व सामजिक सक्षमीकरणा विषयक चिकित्सात्मक अध्ययन (विशेष संदर्भ – नागपूर जिल्ह्यातील लोक संचालित साधन केंद्रातील महिला)” या विषयावर शोध प्रबंध निर्माण करून, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर येथून आचार्य पदवी (पी. एच डी.) करीता सादर केला. नागपूर विद्यापीठाने नुकतेच यादी जाहीर केली असून त्यामध्ये यांचा समावेश आहे.
सचिन देवतळे यांना आचार्य पदवी (पी.एच डी.) करीता प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या महिला आर्थिक विकास महामंडळ, मुंबई मुख्यालयातील अधिकारी, विभागीय अधिकारी, नागपूर जिल्ह्यातील अधिकारी व लोक संचालित साधन केंद्रातील कर्मचारी यांनी मार्गदर्शन व सहकार्य केले. तसेच थोटे समाजकार्य महाविद्यालय नागपूर चे प्राचार्य डॉ.प्रा.थोट, आठवले कॉलेज चे संस्थापक डॉ.चंदनसिंग रोटोले, नालंदा फाऊंडेशन अध्यक्ष व आठवले कॉलेज भंडारा येथील प्रा.अमोलसिंग रोटोले, डॉ.चंद्रमणी गजभिये यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
त्यांच्या या यशाबद्दल आई मंदाकिनी देवतळे, पत्नी मोनिका देवतळे, भाऊ सुहास, स्वप्नील, मुलगी तृशा, मुलगा शौर्य, जिल्हा अग्रणी बँक गडचिरोली चे प्रबंधक युवराज टेंभूर्णे, सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय गडचिरोली चे शुभम कोमरेवार, जिल्हा उद्योग केंद्र गडचिरोली चे महाव्यवस्थापक पवार, हेल्दी माईंड फाऊंडेशन मुंबई चे संचालक दिलीप जाधव, कौन्सिल ऑफ युनिव्हर्सल बुद्धिस्ट युनिव्हर्सिटी नागपूर चे संचालक विलास देशभ्रतार, जेंडर इक्वलिटी ऑर्गनायझेशन नागपूर चे संचालक चंचल पटले, विक्रांत अभोर, आनंद बागडे व किरण मनोहर, डॉ. श्वेताल कांबळे, कैलास बारसागडे, विनोद राऊत, चंद्रशेखर लांडे, गणेश नाईक आदींनी शुभेच्छा व अभिंदन केले.