माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांची पुरग्रस्तांना आर्थिक मदत

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि १२ जुलै
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार हे जनसामान्यांच्या मदतीसाठी धावून जाणारे नेते म्हणून ओळखल्या जातात. संकटाच्या प्रसंगी मदत करणे करणे हा त्यांचा स्वभावगुण आहे. गेल्या काही दिवसापासून अहेरी उपविभागात पुरपरिस्थती निर्माण झाली असून गोरगरीब नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पुराचा फटका बसलेल्या नागरिकांची भेट घेऊन त्यांना आर्थिक मदत दिली.
आलापल्ली येथील वार्ड क्र. ६ मध्ये पुराचे पाणी शिरल्याने काही नागरिकांच्या घरातील अन्नधान्य व जीवनावश्यक साहित्याचे नुकसान झाले. अजय कंकडालवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह पुरग्रस्तांची भेट घेऊन त्यांना आर्थिक मदत दिली.
नैसर्गिक आपत्ती असो की कोणतीही आपत्ती असो, समाजसेवा आपला धर्म आहे. कोणतीही समस्या असल्यास ती माझसा समोर मांडल्यास मी मदतीसाठी सदैव तत्पर राहीन, अशी ग्वाही माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी पुरग्रस्तांना दिली. नुकसानग्रस्त बानुबाई आत्राम, सुरेखा संडा, रामबाई सिंगनेर, नागणा रामगिरवार, अनिल बोलेम आदींना आर्थिक मदत देण्यात आली. याप्रसंगी जुलेख शेख, विजय बोमनवार, गटया बुसावार, पेंटया मुडसुवार, शंकर जगीडवार, शायलू दुपमवार, रामया बोमनवार, सजणा मेकलवार, शंकर आत्राम, बोरकुटे, मोंडी येरावार आदी उपस्थित होते.