आपला जिल्हा

जिल्हा परिषद आरक्षण सोडतीचा कार्यक्रम स्थगित 

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि १२ जुलै

गडचिरोली जिल्हा परिषद व त्याअंतर्गत १२ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीकरीता आरक्षण सोडतीचा कार्यक्रम  बुधवार, १३ जुलै रोजी राबविण्यात येणार होते. मात्र, आता या आरक्षण सोडत बैठकीस राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रान्वये तुर्तास स्थगिती देण्यात आली आहे.

निवडणूक आयोगाच्या ५ जुलै २०२२ च्या आदेशान्वये, राज्यातील २५ जिल्हा परिषद व त्या अंतर्गत येणा-या २८४ पंचायत समिती निर्वाचक गणातील अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला) व सर्वसाधारण (महिला) यांच्याकरीता आरक्षित जागा निश्चित करण्याकरीता सोडत काढण्याचा कार्यक्रम प्राप्त झाला होता. त्या अनुषंगाने गडचिरोली जिल्हा परिषदेमधील निवडणूक विभाग व त्याअंतर्गत पंचायत समित्यांच्या निर्वाचक गणाचे आरक्षण १३ जुलै रोजी सोडत काढून निश्चित करण्याचे आदेश देण्यात आले होते.

परंतु राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येणा-या पंचायत समिती आरक्षण सोडत कार्यक्रमास तुर्तास स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे बुधवारी होणारी जि.प. व पं.स. आरक्षण सोडत सभा स्थगित करण्यात येत आहे, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी कळविले आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!