गडचिरोलीत अवैध दारूचे बार ! पोलीस ठाण्यातूनच हालतात सुत्र ?
पोलीसांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष. महिण्याला २५ लाखांची बिदागी ?
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. १२ नोव्हेंबर
दारुबंदी असलेल्या जिल्ह्यात गडचिरोली शहरासह संपूर्ण परिसरात अवैध दारू विक्रीसह ईतरही अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे. गडचिरोली पोलीस स्टेशन अंतर्गत कनेरी, पारडी, कोटगल, इंदाळा, गडचिरोली शहरातील ढिवर मोहल्ला, तेली मोहल्ला यांचेसह लांझेडा, इंदिरानगर, गोकुलनगर, विवेकानंद नगर, पोलीस स्टेशन पासून अगदी २०० मीटर अंतरापर्यंत अवैध दारू विक्रेत्यांकडून देशी आणि विदेशी दारु मुबलक मिळत आहे.
या संपूर्ण अवैध दारू विक्रीला पोलीस ठाण्यातूनच आशीर्वाद प्राप्त असल्याचे काही दारु विक्रेत्यांनी सांगितले. या अवैध दारू विक्रेत्यांकडून स्थानिक पोलीसांना २५ लाख रुपये प्रतिमाहची बिदागी दिली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. बिदागी घेऊनही आमच्यावर केसेस केल्या जातात. असेही ते म्हणाले.
चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी संपल्यामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या सर्व सीमांवर दारु दुकाने किंवा बार थाटली गेली आहेत. यामधुन गडचिरोली जिल्ह्यात मुबलक दारुचा अवैध पूरवठा होतो.
गडचिरोली शहरात बारमध्ये बसुन दारुचा आस्वाद घेता येईल अशी अवैध दारू विक्रीची अनेक ठिकाणे आहेत. त्याची संपूर्ण माहिती पोलीसांकडे आहे. कित्येक पोलीसही अशा ठिकाणी जाऊन आपला शौक पूर्ण करताना आढळून आले आहेत. यातूनच अवैध दारू विक्रीला बळ मिळत असल्याचे दिसून येत आहे.
एका नागाच्या विळख्यात सर्व दारुविक्रेत्यांचे सिंडीकेट कार्यरत असल्याची चर्चा आहे. यात मोरू, बालाजी, सुमन, रवि, सचिन, पवन, गोपाल यासारखी अनेक मंडळी आहेत. या सर्वांना डीबी चे पाठबळ असल्याची चर्चा आहे.
पोलीसांच्या आशीर्वादानेच गडचिरोली पोलीस ठाणे हद्दीत अवैध दारुचा सुळसुळाट वाढला असल्यामुळे ही अवैध दारू बंद कोण करील असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. गडचिरोलीचे नवीन जिल्हा पोलीस अधीक्षक आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक यावर उपाय योजना करतील काय? याकडेही नागरिकांचे लक्ष लागून आहे.