आपला जिल्हा

भाजपला फोडाफोडीच्या राजकारणाला उत्तर द्यावे लागेल : आमदार अनिल देशमुख

अतुल गण्यारपवार यांचे माध्यमातून गडचिरोली येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.१२ जुलै

आगामी निवडणुकीत भाजप स्वतःच्या ताकतीवर आमदार आणि खासदार निवडून आणू शकत नाही हे लक्षात आल्यामुळे त्यांनी विविध पक्ष फोडण्याचे कारस्थान रचले आहे. विविध आमिषं देऊन किंवा इडी, सीबीआय चा धाक दाखवून पक्ष फोडण्याचे कारस्थान रचले गेले आहे. मात्र जनता त्यांच्या या फोडाफोडीच्या राजकारणाला कंटाळली आहे. पुढील निवडणुकीत मतं मागताना भाजपला याचे उत्तर द्यावे लागणार आहे. असे प्रतिपादन आमदार अनिल देशमुख यांनी केले. ते अतुल गण्यारपवार यांचे माध्यमातून गडचिरोली येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. यावेळी मंचावर राष्ट्रवादी काँग्रेसचे गडचिरोली जिल्हा निरीक्षक राजेंद्र वैद्य, चामोर्शी कृऊबासचे सभापती अतुल गण्यारपवार, माजी अध्यक्ष सुरेश पोरेड्डीवार, जिपचे माजी कृषी सभापती जगन्नाथ पाटील बोरकुटे, जेष्ठ नेते शाम धाईत, शहर अध्यक्ष विजय गोरडवार यांचे सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

शरद पवारांवर प्रेम करणारी माणसं राज्यभर आहेत. ती माणसं आज एकत्र आली आहेत. त्यांच्या भरवशावर मुळ राष्ट्रवादी काँग्रेसचा पाया आणखी मजबूत करु. असे ते पुढे म्हणाले. अतुल गण्यारपवार यांच्यासारख्या दमदार नेतृत्व करणाऱ्या विविध कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पोकळी भरून काढणार असुन पक्षापासून दुर गेलेल्यांना जवळ करुन पक्ष संघटना मोठी करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

अतुल गण्यारपवार यांनी त्यांच्या भाषणात सांगितले की लाखोंच्या ताकतीचे आणि संपूर्ण जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणारे कार्यकर्ते या सभेत आहेत. यापूर्वी कुठेतरी दुखावलेली पण शरद पवारांवर प्रेम करणारी माणसं आज संकटकाळी एकत्र आली आहेत. गडचिरोलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे मोठे नेटवर्क आहे. भविष्यातील सगळ्या निवडणुकांत यश मिळेल. असे ते म्हणाले

शरद पवारांवर प्रेम करणारी माणसं जिल्हाभर आहेत. धर्मराव आत्राम यांना राष्ट्रवादी अहेरीच्या बाहेर जाऊ द्यायचा नव्हता. ते गेल्यामुळे आता सगळ्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन अधिक ताकदीने पक्ष उभा होईल. गडचिरोलीची घडी व्यवस्थित करणार. पक्षाची पुनर्बांधणी करुन गडचिरोली जिल्ह्यात मुळ राष्ट्रवादीची ताकद तिपटीने वाढवणार. ज्यांना शरद पवारांनी मोठं केलं ते सोडून गेल्याचं दुःख आहे असे प्रतिपादन निरीक्षक राजेंद्र वैद्य यांनी केले. मेळाव्याला संपूर्ण जिल्ह्यातून १ हजारांहून अधिक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. दुपारी एक वाजता पासून प्रमुख वक्ते अनिल देशमुख यांची वाट पाहत सायंकाळी आठ वाजता पर्यंत कार्यकर्ते थांबले. पण कार्यक्रम सोडून गेले नाही. हे या मेळाव्याचे वैशिष्ट्य होते.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!