विशेष वृतान्त

अतुल गण्यारपवार यांच्या वाढदिवसानिमित्त ६३ हून अधिक रक्तदात्यांचे रक्तदान

भेंडाळ्यात भव्य रक्तदान व मोफत ईसीजी तपासणी शिबिर; ८ सप्टेंबरच्या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. १० सप्टेंबर 

वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्याची गेल्या चाळीस वर्षापासूनची परंपरा कायम ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती, चामोर्शीचे सभापती अतुल गण्यारपवार यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवार ८ सप्टेंबर रोजी भेंडाळा येथील किसान भवन येथे भव्य रक्तदान व मोफत ईसीजी तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या सामाजिक उपक्रमाला परिसरातील युवक, नागरिक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते व विविध क्षेत्रातील मान्यवरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात ६३ हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून ‘रक्तदान हेच श्रेष्ठदान’ या भावनेला प्रत्यक्ष कृतीची जोड दिली.

गेल्या चाळीस वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जपण्याचा आदर्श गण्यारपवार यांनी निर्माण केला आहे. त्यांच्या पुढाकारातून दरवर्षी ५०० हून अधिक रक्तदात्यांचे रक्तदान, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक व जीवनावश्यक साहित्याचे मोफत वितरण, नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरे, मोफत चष्म्यांचे वितरण तसेच गरीब व गरजू रुग्णांना नागपूरसारख्या शहरात डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी मदत केली जाते.
यासोबतच अनेक गावांमध्ये फळझाडे व औषधी वनस्पतींच्या रोपांचे मोफत वितरण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेशही दिला जात आहे.

भेंडाळा येथे युवकांसह नागरिक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. ६३ हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून गरजू रुग्णांसाठी जीवनदायी योगदान दिले. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याला आयोजकांच्या वतीने प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

रक्तदानासोबतच नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत मोफत ईसीजी (ECG) तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
परिसरातील शेकडो नागरिकांनी, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी, मोफत ईसीजी तपासणीचा लाभ घेतला.
या सामाजिक उपक्रमासाठी गण्यारपवार फाऊंडेशन, चामोर्शी, त्यागमूर्ती सोनिया गांधी माध्यमिक विद्यालय, मोहाळी (मो.), भारतरत्न राजीव गांधी माध्यमिक विद्यालय, मुरखळा माल तसेच भेंडाळा व परिसरातील ग्रामस्थ आणि स्वयंसेवकांनी पुढाकार घेतला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अमोल गण्यारपवार व संस्था अध्यक्ष अजिंक्य गण्यारपवार यांच्या मार्गदर्शनाखाली, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हा चिटणीस नरेंद्र जुवारे, भेंडाळा ग्रामपंचायत सरपंच कुंदा जुवारे, फोकुर्डी ग्रामपंचायत सरपंच रुपाली दहेलकर, सामाजिक कार्यकर्ते भगिन्द्र झाडे, नामदेव पाटील किनेकर, शामराव पाटील पोरटे, गुरुदास पाटील चुधरी यांच्या नेतृत्वात डॉ. शुभम कोसमसीले, डॉ. शुभम डुंपेट्टीवार, मनीषा मेश्राम, समचिराण चिडके या वैद्यकीय तज्ञासोबातच, प्रमोद गोरलावार, प्राचार्य जे. विलास, हरीश गेडाम, शिवाजी मंडळ भेंडाळा, संदीप  आभारे, सोमेश्वर पाट्टेवार, रामाळा, अनिल आभारे, उत्साही गणेश मंडळ भेंडाळा, वीर शिवाजी मंडळ घारगाव, सुनिल आभारे, लोभेश गोरलावार, संदीप बट्टे, चेतन गोरलावार, श्रावण मेश्राम, पुरुषोत्तम चापले, सुशील बंडावार, मंगेश हुमणे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक, स्थानिक कार्यकर्ते व स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेतले.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!