विशेष वृतान्त

कोठी – कोरनार पुलाच्या निकृष्ट बांधकामाची चौकशी होणार

बीआरएसपीच्या निवेदनाची मुख्यमंत्री कार्यालयाकडून दखल

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. १८ ऑगस्ट 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १५ ऑगस्ट २०२३ रोजी उद्घाटन झालेल्या एटापल्ली तालुक्यातील कोठी-कोरनारचा पूल नाल्याच्या पुराने खचून गेल्याची घटना मागील महिन्यात घडली. या निकृष्ट कामाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याचे संकेत मुख्यमंत्री सचिवालयाने दिले. यासंदर्भात बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी आणि अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने मुख्यमंत्री कार्यालयाकडे निवेदन पाठविले होते. त्याची दखल घेत मुख्यमंत्री सचिवालयाने चौकशी करण्याचे संकेत दिले.

याप्रकरणी बीआरएसपीने मुख्यमंत्री व पालकमंत्री यांना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पाठविलेल्या निवेदनात कोठी-कोरनार पूल दुर्घटनेसंदर्भात अधीक्षक अभियंता निता ठाकरे यांच्या कार्यकाळातील कामांची व मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी केली. तसेच सर्व दोषींवर कारवाई करण्याची मागणी जिल्हा अध्यक्ष मिलिंद बांबोळे व पदाधिकाऱ्यांनी केली होती.

मागणीची दखल घेत मुख्यमंत्री सचिवालयाने उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहे. त्यासंदर्भातील पत्र १७ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री सचिवालयाकडून मिलिंद बांबोळे यांना प्राप्त झाले. या प्रकरणातील संबंधित अधिकारी, कंत्राटदार आणि बांधकामासंदर्भातील व्यवहारात दोषी असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली होती.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!