अयोध्या येथील दानपेटी व देणगी चोरीची निष्पक्ष चौकशी करा; कांग्रेसचा गडचिरोलीत ‘रघुपती राघव राजाराम’ भजन सत्याग्रह
एड. विश्वजीत कोवासे यांचे नेतृत्वात आंदोलनातून मागणी

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. ९ जुलै
श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राच्या आर्थिक व्यवहारांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा या मागणीसाठी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष विश्वजीत मारोतराव कोवासे यांचे नेतृत्वात शहरातील चंद्रपूर मार्गावरील फुटका देवळाजवळील राममंदिरात रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.
रघुपती राघव राजा राम असे भजन म्हणत आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र, अयोध्या येथील दानपेटी व देणग्यांच्या व्यवस्थापनाबाबत विविध माध्यमांमध्ये व सार्वजनिक चर्चेत होत असलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर संबंधित प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी गडचिरोली गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली.
यासंदर्भात पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन गडचिरोली यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे महासचिव चंपत राय, ट्रस्टी अनिल मिश्रा आणि कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देवगिरी यांच्याविरुद्ध झालेल्या आरोपांची निष्पक्ष चौकशी करून, चौकशीत कोणताही गैरप्रकार सिद्ध झाल्यास संबंधितांविरुद्ध कायद्यानुसार योग्य कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, देशभरातील लाखो रामभक्त श्रद्धेने मंदिरात देणग्या अर्पण करतात. त्यामुळे देणग्यांच्या व्यवस्थापनात पूर्ण पारदर्शकता राखली जावी आणि जनतेचा विश्वास अबाधित राहावा, यासाठी संबंधित यंत्रणांनी वस्तुनिष्ठ चौकशी करणे आवश्यक आहे. तसेच, या प्रकरणात सक्षम प्राधिकरणाने निष्पक्ष तपास करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी करण्यात आली असून, योग्य ती कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य राम मेश्राम, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव पंकज गुड्डेवार, गटनेते तथा नगरसेवक सतीश विधाते, नगरसेवक रमेश चौधरी, नगरसेवक नंदू कायरकर, नगरसेवक पराग पोरेडीवार, उपाध्यक्ष निकेश गद्देवार, माजी नगरसेवक बंडू शनिवारे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विनोद लेनगुरे, नंदु वाईलकर, आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष माधवराव गावळ, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष मनोज ढोरे, अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, परिवहन सेलचे जिल्हाध्यक्ष रुपेश टिकले, एन एस यु आय चे जिल्हाध्यक्ष राहुल वैरागडे, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव विवेक घोंगडे ज्येष्ठ नेते प्रभाकर वासेकर, ज्येष्ठ नेते हरबाजी मोरे, ज्येष्ठ नेते शंकरराव सालोटकर, जितू मुनघाटे, सोनू अलाम, मिलिंद खोब्रागडे, भोयर ताई, शितल ठवरे, कविता उराडे, रिता गोवर्धन, प्रा. अर्चना राजेश चन्नावार, मीनल चिमूरकर, सरपंच संजय गावडे, निकेश कामीडवार, अभिजीत घाईत, मदनजी मडावी, गजेंद्र नाईक, हेमंत कोवासे, विलास चीचघरे, आशिष घेर, विजय लाड, ओमप्रकाश चौधरी, हेमंत मोहितकर, चोखाजी बांबोळे, सचिन गावतुरे, उपस्थित होते.



