विशेष वृतान्त

गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. विश्वजीत कोवासे यांचा सत्कार

भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदयभानू चिब यांनी दिल्या शुभेच्छा

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. २ जून 

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक पुणे आयोजित केली होती. यावेळी गडचिरोली जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष ॲड.विश्वजीत मारोतराव कोवासे यांचा भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदयभानू चिब यांच्या हस्ते सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

राष्ट्रीय अध्यक्ष उदयभानू चिब यांनी ॲड.विश्वजित कोवासे यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील राजकीय व संघटनात्मक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. काँग्रेस पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवून संघटना अधिक बळकट करण्यासाठी अथक परिश्रम घ्यावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव अजय चिकारा, महाराष्ट्राचे सहप्रभारी नवज्योतसिंग सिंधु, महाराष्ट्र सहप्रभारी शांभवी शुक्ला, गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितेश राठोड, प्रदेश सचिव सौरभ पाटील म्हशाखेत्री, तसेच महाराष्ट्रातील युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!