विशेष वृतान्त

गडचिरोली – उमरखेड बसला अपघात; ७ महिन्याच्या तान्हुल्यासह तिघांचा मृत्यू तर ३३ जखमी

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. २१ मे 

गडचिरोलीहून उमरखेडकडे (जि. यवतमाळ) निघालेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसला गुरुवारी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. चंद्रपूर मार्गावरील नवेगाव-मुरखळा परिसरात चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव बसने लोखंडी कठडा तोडत रस्त्याच्या कडेला शेतात उलटली. या दुर्घटनेत ७ महिन्यांच्या चिमुकल्यासह दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून ३३ प्रवासी जखमी झाले आहेत.

ख्वाजा शाहबुद्दीन (६०, रा.देसाईगंज ), लक्ष्मीबाई दुरकीवार (५५ रा. नवरगाव ) असे मृत प्रवाशाचे नाव आहे. तर गंभीर जखमी अवस्थेत उपचार सुरू असलेल्या शिवांश नवघरे या बालकाची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

नियंत्रण सुटल्याने अपघात!
गडचिरोली-उमरखेड ही एसटी बस (एमएच १४ बीटी-०७४०) नेहमीप्रमाणे सकाळी प्रवाशांना घेऊन निघाली होती. सकाळी साडेसातच्या सुमारास नवेगाव-मुरखळा गावाजवळील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले. बस थेट रस्त्याच्या कडेला असलेला लोखंडी कठडा तोडून खाली घसरली आणि उलटली. अपघात होताच बसमध्ये एकच गोंधळ उडाला. प्रवाशांच्या किंकाळ्यांनी परिसर दणाणून गेला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. काही प्रवाशांना बसच्या खिडक्या फोडून बाहेर काढण्यात आले. गडचिरोली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत बचावकार्याला गती दिली. मात्र, उपचारादरम्यान गंभीर जखमी असलेल्या सात महिन्याच्या चिमुकल्यासह तिघांचा मृत्यू झाला.

जखमींची प्रकृती स्थिर
सर्व जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. बहुतांश जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनीही जिल्हा रुग्णालयात भेट देत जखमींची विचारपूस केली व उपचारात कोणतीही कमतरता राहू नये, अशा सूचना प्रशासनाला दिल्या.

अपघातातील जखमी
या अपघातात धनश्री ललित चांदेकर, आशिष संघपाल साखरकर, मायाबाई बाबुराव कांबळे, संगीता बाबुराव कांबळे, ज्योती अविनाश पाल, श्रीहरी खळकर, बेबीबाई खळकर, चैतन्य मेडीवर, तानिया मेडीवर, वैशाली माडेवार, रूपाली खणके, ललिता खणके, ऋषभ खडके, सचिन वाळके, जयश्री वरभे, सचिन वरदे, जयश्री खाणके, रत्नाकर राऊत, पार्थ राऊत, मंगला कळसकर, भूषण दुरकीवार, चालक रोहित देशमुख, वाहक संदीप पवार, विकी शेंडे, तारा साबळे, श्वेता स्वप्नील नवघरे, डॉ. गणेश जैन, सुमन कत्तलवार, व्यंकट ढगे, अश्विनी तोरपे, किशोर गावतुरे आणि गौरव कुमरे यांच्यासह अनेक प्रवासी जखमी झाले आहेत.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!