‘लॅायड्स’ ने पटकावले ब्रँड परिवर्तनातील तीन पुरस्कार ; स्लरी पाईपलाईनची सुवर्ण कामगिरी
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क, गडचिरोली दि १८ मे
जिल्ह्याला औद्योगिक नकाशावर आणणाऱ्या लॅायड्स मेटल्स ॲन्ड एनर्जी लि. अंतर्गत लॅायड्स इन्फिनिट फाऊंडेशनला ईटी ब्रँड संदर्भातील तीन पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. ही तिहेरी कामगिरी या कंपनीसाठी अभिमानास्पद ठरली आहे.
२०२६ च्या ईटी ब्रँड बदलासंदर्भातील या पुरस्कारांमध्ये सस्टेनेबल स्लरी पाईपलाईन लॅाजिस्टिक्ससाठी कंपनीला सुवर्ण पुरस्कार, तर परिवर्तनकारी एचआर उपक्रमांसह समावेशक ग्रामीण विकासात्मक उपक्रमांसाठी रौप्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शाश्वत संचालन, नाविन्यपूर्ण एच आर उपक्रम आणि समावेशक समुदाय विकासासाठी हे तीन प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त झाले.
लॅायड्स मेटल्सला ला सर्वाधिक क्रांतीकारी पुरवठा साखळी आणि लॉजिस्टिक्स या श्रेणीत त्यांच्या अग्रगण्य आयरन ओर स्लरी पाईपलाईन प्रकल्पासाठी सुवर्ण पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा प्रकल्प भारतातील खनिज वाहतुकीला अधिक शाश्वत आणि आधुनिक स्वरूप देत आहे. या उपक्रमामुळे इंधन वापर आणि कार्बन उत्सर्जनात लक्षणीय घट झाली असून लोखंड धातूची अधिक सुरक्षित, जलद आणि पर्यावरणपूरक वाहतूक शक्य झाली आहे.
याशिवाय लॅायड्सच्या कोनसरी युनिटला सर्वाधिक परिवर्तनशिल एचआर टिम म्हणून गौरविण्यात आले. कर्मचारी कल्याण, कौशल्य विकास, कार्यस्थळी समावेशकता आणि डिजिटल एचआर परिवर्तनावर आधारित प्रगत आणि कर्मचारी केंद्रित एचआर उपक्रमांसाठी हा रौप्य पुरस्कार देण्यात आला. हा सन्मान त्यांच्या प्रभावी व्हिलेज ऑपरेटिव्ह सिस्टिम या उपक्रमासाठी प्रदान करण्यात आला, ज्याचा उद्देश तंत्रज्ञान-सक्षम ग्रामीण परिवर्तन, सर्वसमावेशकता आणि ग्रामीण विकासाला चालना देणे हा आहे.
“हे सन्मान टिम लॅायड्सच्या शाश्वत विकास, नाविन्य, समावेशक एचआर पद्धती आणि अर्थपूर्ण सामाजिक परिवर्तनासाठी असलेल्या वचनबद्धतेचे प्रतीक आहेत. स्लरी पाईपलाईनद्वारे भविष्योन्मुख पायाभूत सुविधा उभारण्यापासून लोककेंद्रित कार्यसंस्कृती निर्माण करण्यापर्यंत आणि गडचिरोलीतील समुदायांना सक्षम करण्यापर्यंत, आमची दृष्टी नेहमीच जबाबदार आणि सर्वसमावेशक विकासावर आधारित राहिली आहे. या यशामागील प्रत्येक टिम लॅायड्स सदस्याच्या समर्पण आणि एकत्रित प्रयत्नांसाठी मी त्यांचे अभिनंदन करतो.”
बी. प्रभाकरन , व्यवस्थापकीय संचालक एलएमईएल


