
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.१४ ऑगस्ट
भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगावर दबाव टाकून, आयोगाच्या यंत्रणेचा गैरवापर करत मतदार यादीत मोठ्या प्रमाणात फेरफार व घोटाळे केले आहेत, आणि मतांची चोरी करून गैरमार्गाने सत्ता मिळवली आहे. हा प्रकार फक्त राजकीय कपट नसून लोकशाहीवर थेट हल्ला आहे. काँग्रेस पक्षाने या मतचोरीचा सातत्याने पर्दाफाश केला असून, जनतेसमोर ठोस पुरावे मांडले आहेत. मतदार यादीतील फेरफार, खोट्या नावांचा समावेश, मतदान केंद्रांवरील अनियमित घटना – या सर्वांमुळे मतदारांच्या पवित्र मतदान अधिकाराचा सरळ अपमान झाला आहे. या गंभीर व लोकशाहीविरोधी प्रकाराचा निषेध नोंदवण्यासाठी आणि जनतेत जागरूकता निर्माण करण्यासाठी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा काँग्रेस कार्यालया पासून इंदिरा गांधी चौकापर्यंत भव्य कॅन्डल व मशाल मोर्चा काढण्यात आला.
मोर्चात सहभागी नागरिकांनी “गली गली मै शोर है, मोदी सरकार चोर है, आणि वोट चोर गद्दी छोड” अशा घोषणा दिल्या. मशालींच्या धगधगत्या ज्वाला आणि कॅन्डलच्या तेजोमय प्रकाशामुळे गडचिरोलीच्या रस्त्यांवर लोकशाहीच्या रक्षणाचा संदेश ठळकपणे उमटला.
यावेळी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव विश्वजित कोवासे, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा ऍड. कविता मोहरकर,आरमोरी तालुका अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, चामोर्शी तालुका अध्यक्ष प्रमोद भगत, गडचिरोली तालुका अध्यक्ष वसंत राऊत, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, किसान सेल जिल्हाध्यक्ष वामन सावसागडे, शिक्षक सेल अध्यक्ष दत्तात्रेय खरवडे, अब्दुल पंजवानी, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, परिवहन सेल अध्यक्ष रुपेश टिकले, माजी नगरसेवक रमेश चौधरी, देवाजी सोनटक्के, प्रभाकर वासेकर, दिलीप घोडाम, राजेश ठाकूर, उत्तम ठाकरे, शंकरराव सालोटकर, अनिल कोठारे, काशिनाथ भडके, लालाजी सातपुते, श्रीनिवास ताटपल्लीवार, मिलिंद बारसागडे, अनिल भांडेकर, हरबाजी मोरे, सुभाष धाईत, प्रफुल बारसागडे, विजय लाड, माजीद सय्यद, गौरव येनप्रेडीवार, गुलाब मडावी, राकेश रत्नावार, विपुल येलटीवार, प्रफुल बारसागडे, नंदू कायरकर, स्वप्नील बेहरे, दिवकर निसार, धिवारू मेश्राम, मिलिंद बारसागडे, कुणाल ताजने, रामभाऊ नन्नावरे, कमलेश खोब्रागडे, नरेंद्र पोटावी, उमेश आखाडे, मनोहर पोटावी, पुरुषोत्तम सिडाम,उमेश आखाडे, विनोद निकुरे, दीपक चौधरी, धिवरू मेश्राम, निकेश कमीडवार, मेंगाजी कोडाप, देवाजी नैताम, रितिक सोनुले, श्रीराम मोहुर्ले, बाबुराव गेडाम, महागु पीपरे, संजय वाकडे, कुमोद माधमवार, सिद्धार्थ शेंडे, संदीप ऊईके, पत्रुजी बाबनवाडे, आनंद धुडसे, आनंद भोयर, उमाजी उईके, बाळासाहेब आखाडे, जगदीश वरगंटिवार, जितेंद्र मुप्पीडवार,अनिकेत राऊत, रामचंद्र नैताम, डोमा सिडाम, मनोज उंदीरवाडे, सुरज मडावी, रमेश मानकर, हरिदास सेलोटे, दुमाजी जुमनाके, सुनील चलाख, अपर्णा खेवले, मंजू आत्राम, कविता भगत, रिता गोवर्धन, सुनीता रायपुरे, पौर्णिमा भडके सह मोठ्या संख्येने नागरिक, युवक, महिला आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.