जीडीपीएल च्या उद्घाटन सोहळ्याला क्रिकेट प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे
कार्यकारी संचालक एस एस खांडवावाला आणि बलराम सोमनानी यांचे आवाहन

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.५ फेब्रुवारी
गडचिरोली,ता.४: लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडच्या वतीने आजपासून गडचिरोली डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग (GDPL) स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, क्रीडांगणावर पोहचण्यासाठी प्रेक्षकांना बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. सोबतच वेळेपूर्वी पोहचणाऱ्या प्रेक्षकांना टी शर्ट आणि भरपेट नाश्ताही देण्यात येणार आहे.
प्रसिद्ध क्रिकेटर तथा समालोचक रवि शास्त्री यांचे दुपारी २ वाजता हेलिकॉप्टरने आगमन होणार आहे. त्यानंतर ते पोलीसांसोबत स्नेह भोजनाचा आस्वाद घेतील आणि ३. १५ वाजता मैदानावर पोहोचतील तेथे त्यांना स्वागतपर सलामी दिली जाईल. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आयोजन समितीचा परिचय, मार्च पास्ट, शपथग्रहण आणि राष्ट्रगीत होईल. श्री शास्त्री यांचे स्वागतानंतर सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होतील. आणि ठीक ५ वाजता पहीली मॅच खेळली जाईल. ज्यात लॉयड्सचा संघ सहभागी असेल.
प्रसिद्ध क्रिकेटर तथा समालोचक रवि शास्त्री व लॉयड्स मेटल्सचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांचे दुपारी २ वाजता हेलिकॉप्टरने आगमन होणार आहे. त्यानंतर ते पोलीसांसोबत स्नेह भोजनाचा आस्वाद घेतील आणि ३. १५ वाजता मैदानावर पोहोचतील तेथे त्यांना स्वागतपर सलामी दिली जाईल. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आयोजन समितीचा परिचय, मार्च पास्ट, शपथग्रहण आणि राष्ट्रगीत होईल. श्री शास्त्री यांचे स्वागतानंतर सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होतील. आणि ठीक ५ वाजता पहीली उद्घाटनीय मॅच खेळली जाईल. ज्यात लॉयड्सचा संघ सहभागी असेल.
दुपारी ३ वाजतापूर्वी आत येणाऱ्या प्रेक्षकांना टी शर्ट आणि नाश्ता देण्यात येणार आहे. शिवाय एमआयडीसी मैदानावर पोहचण्यासाठी गडचिरोली येथील राधे बिल्डींग समोरुन, बस डेपो, इंदिरा गांधी चौकातील विश्रामगृह, आयटीआय चौक, न्यायालय परिसर या ठिकाणांहून मोफत बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. क्रिकेटप्रेमींनी हा ऐतिहासीक सोहळा आणि सामन्यांचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन लॉयड्स चे कार्यकारी संचालक एस एस खांडवावाला आणि बलराम सोमनानी यांनी केले आहे.