देसाईगंज येथील लोक अदालतीत ४६ प्रकरणांचा निपटारा, २८ लाख वसूल

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि १४ ऑगस्ट
देसाईगंज तालुका विधि सेवा समिती अंतर्गत खटला पूर्व प्रकरणे, नियमित दिवाणी व फौजदारी प्रकरणात वादी व प्रतिवादी यांच्यातील वाद सामोपचार व सलोख्याने मिटविण्यासाठी शनिवारी येथे लोक अदालतीचे आयोजन केले होते. यात ४६ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. २८ लाख रुपयांची वसुली करण्यात आली.
या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये खटलापूर्व ३८, नियमित फौजदारी व दिवाणी खटला प्रकरणाचे ८ मामले असे एकूण ४६ मामले मिटवून यात एकूण २८ लाख ६० हजार ४४४ रुपये वसूल करण्यात आले. सदर राष्ट्रीय लोक अदालतीला दिवाणी व फौजदारी न्यायालय देसाईगंजचे न्यायाधिश ए.आर.भडके, अधिवक्ता अँड जे व्ही मेश्राम, अँड संजय गुरू, अँड मंगेश शेंडे, अँड.किशोर चोपकार, अँड बि. एम. बांबोळकर, अँड लाॅंगमाच॔ खोब्रागडे, अँड .दत्ता पिलारे, अँड प्रमोद बुद्धे व अन्य सामाजिक कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
सदर राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन यशस्वी करण्यासाठी देसाईगंज न्यायालयातील आस्थापना विभागाचे सहायक अधीक्षक एम सी चव्हाण, कर्मचारी लघुलेखक व्ही एस महल्ले, वरिष्ठ लिपिक चेतन भुर्रे, कनिष्ट लिपीक प्रविण माटे, कनिष्ठ लिपीक नरेंद्र लोंढे, ,कनिष्ट लिपीक रवी कामटकर, कनिष्ठ लिपीक दुर्गेश महाजन,शिपाई पुष्पा दासरवार, शिपाई अंकुश मच्छीरके, कारकुन प्रविण मेश्राम आदींनी अथक परिश्रम घेतले.
राष्ट्रीय लोकअदालतीत प्रकरणांचा निपटारा लवकर लागत असल्याने दिवसेंदिवस लोकअदालतीत ठेवण्यात येणाऱ्या प्रकरणांची संख्या वाढत चालली आहे.