डॉ होळींनी आगामी विधानसभा निवडणुकीत विजयासाठी सुरू केली व्यापक जनसंपर्क मोहीम
दररोज घेताहेत विविध समाजांचे मेळावे
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि १८ ऑगस्ट
गडचिरोलीचे आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी विधानसभा निवडणुका लक्षात घेता व्यापक जनसंपर्क मोहीम हाती घेतली असून ते दररोज विविध समाजांचे मिळावे घेऊन लोकांना सरकारच्या योजनांबद्दल माहिती देत आहेत. सोबतच माझी लाडकी बहीण योजने संदर्भातील लाभ मिळवून देण्यासह, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. समाजात घडणाऱ्या विविध घटनांकडे लक्ष देऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठी प्रशासकीय दरबारात जाऊन आवश्यक ते निर्देश देणे इत्यादी कामे करीत आहेत. त्यांच्या या जनसंपर्क मोहीमेला व्यापक प्रतिसाद मिळत असल्यामुळे ते भाजपच्या तिकिटाचे प्रमुख दावेदार बनले आहेत.
गडचिरोली विधानसभा क्षेत्रात डॉ होळींची ही दुसरी टर्म असून ते सध्या हैटट्रिकच्या प्रयत्नात केवळ भाजपमधुनच नव्हे तर सर्वच राजकीय पक्षांच्या तुलनेत जनसंपर्कात सर्वात पूढे दिसून येत आहेत.
१४ ऑगस्ट रोजी चामोर्शी येथे तर १५ ला गडचिरोलीत तिरंगा सन्मान रॅली काढून त्यांनी आपला प्रभाव अधोरेखित केला. १८, १९, २० ऑगस्ट या कालावधीत कुणबी, आदिवासी आणि बौद्ध समाजाचे मेळावे घेत आपल्या अस्तित्वाची दखल घ्यायला भाग पाडले. पक्षांतर्गत सर्वच प्रमुख नेत्यांच्या भेटी घेतल्या आपल्याला समर्थन द्यावे असा त्यांचा प्रयत्न आहे. एक विशिष्ट रणनीती अंतर्गत ते आगामी विधानसभा निवडणुकीतून हैटट्रिक करण्यासाठी रात्रंदिवस एक करीत आहेत. नोव्हेंबर मध्ये विधानसभा निवडणूक होऊ घातली असून निकालानंतरच त्यांच्या प्रयत्नांना कितपत यश मिळेल हे दिसून येइल.