आपला जिल्हाक्राईम स्टोरी

सहा लाख बक्षिस असलेल्या महिला नक्षलीस गडचिरोली पोलीसांकडून अटक

वयाच्या १२ व्या वर्षी बनली होती नक्षली पोलीसांचा दावा

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि २६ फेब्रु.

गडचिरोली पोलीस दलाने सुरक्षा दला विरुद्धच्या अनेक हिंसक घटनांमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या एका महिला नक्षलीस रविवारी अटक केल्याची माहिती सोमवारी प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे. रविवारी पोलिसांनी मागील वर्षी माहे एप्रिल २०२३ मध्ये केडमारा जंगल परिसरात झालेल्या पोलीस माओवादी चकमकीच्या अनुषंगाने भामरागड येथे महिला नक्षलवादी राजेश्वरी ऊर्फ कमला पाडगा गोटा, वय ३० वर्षे, रा. बडा काकलेर, तह. भोपालपट्टनम, जि. बीजापूर (छ.ग.) हिला विशेष अभियान राबवून अटक केली.राजेश्वरी ऊर्फ कमला ही वयाच्या १२ व्या वर्षी नक्षलवाद्यांच्या दलममध्ये सामील झाली होती. असे म्हटले आहे.

पोलिसांच्या अधिक तपासात असे दिसून आले की, ३० एप्रिल २०२३ रोजी मौजा केडमारा येथे झालेल्या चकमकीमध्ये तिचा प्रत्यक्ष सहभाग होता ज्यामध्ये ३ माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले होते. छ.ग. मधील कचलाराम जंगल परिसरात झालेल्या चकमकीमध्ये तिचा प्रत्यक्ष सहभाग असून तिला सदर चकमकीच्या अनुषंगाने दाखल पोस्टे तोयनार येथे २०१९ मध्ये अटक करण्यात आली होती.

राजेश्वरी ऊर्फ कमला पाडगा गोटा ही २००६ साली म्हणजेच वयाच्या १२ व्या वर्षी अर्थात बाल नक्षली म्हणून चेतना नाट्य मंचामध्ये सदस्य या पदावर भरती होऊन माओवादी चळवळीत सक्रीय झाली. २०१०-११ साली, वयाच्या १७ व्या वर्षी चेतना नाट्य मंचामध्ये उप-कमांडर या पदावर पदोन्नती झाली. २२ व्या वर्षी २०१६ साली फरसेगड दलममध्ये बदली होऊन सन २०१९ पर्यंत सदस्य पदावर कार्यरत होती. या वर्षी बीजापूर जिल्ह्यातील पोस्टे तोयनार जंगल परिसरात पोलीस पार्टी सोबत झालेल्या चकमकीच्या अनुषंगाने दाखल गुन्ह्यात तिला अटक करण्यात आली होती. २०२० मध्ये कारागृहातुन सुटका झाल्यानंतर आतापर्यंत टेलर टीम दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटी मध्ये एरीया कमिटी मेंबर पदावर कार्यरत होती.

२०१६ मध्ये छत्तीसगड मधील कर्रेमर्का, फरसेगड, मरेवाडा जंगल परिसरात पोलीसांसोबत झालेल्या चकमकीमध्ये, २०१८ मध्ये छत्तीसगड मधील बीजापूर जिल्ह्यातील कचलाराम जंगलपरिसरात पोलीसांसोबत झालेली चकमक, २०२३ मध्ये केडमारा(ता.भामरागड) जंगल परिसरात गडचिरोली पोलीसांसोबत झालेल्या चकमकीमध्ये तिचा सहभाग होता. असे पोलिसांनी म्हटले आहे. महाराष्ट्र शासनाने राजेश्वरी ऊर्फ कमला पाडगा गोटा हिच्या अटकेवर ६ लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले आहे.

गडचिरोली पोलीस दलाने कारवायांमध्ये माहे जानेवारी २०२२ ते फेब्रुवारी २०२४ पर्यंत एकुण७३माओवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आलेले आहे. पोलीस अधीक्षक नीलोत्पल बसू यांनी,  हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.

 

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!