आपला जिल्हा
माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या नेतृत्वात अहेरी न.पं. च्या शिष्टमंडळाने घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि २८ ऑगस्ट
जि.प. माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या नेतृत्वात अहेरी नगर पंचायत मधील शिष्टमंडळानी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय मीणा यांची भेट घेवुन विविध विकास कामाबाबत चर्चा केली तसेच भ्रष्टाचार झालेल्या कामाबाबत चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली. जि.प. माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या नेतृत्वात अहेरी न.पं.चे नगराध्यक्ष रोजा करपेत, उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन, नगरपंचायत चे बालकल्याण सभापती मीना ऑडरे, जोती सड़मेक, निखत रियाज शेख, विलास सिडाम, विलास गलबले, महेश बाकेवार, प्रशांत गोडसेलवार, अजय सडमेक उपस्थित होते.