कत्तलींसाठी नेणाऱ्या ५२ गोवंशाची सुटका, दोन ट्रक जप्त
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि १४ ऑगस्ट
शेतकऱ्यांकडून गोवंश खरेदी करून ट्रक मध्ये कोंबून कत्तलीसाठी नेत असताना गडचिरोली पोलिसांनी सापळा रचून ५२ गोवंशाची सुटका केली आहे. व दोन ट्रक जप्त करण्यात आला. ही कारवाई शनिवारी चातगाव येथे गडचिरोली पोलिसांनी केली.
ट्रक मध्ये कोंबून पेंढरी मार्गे गोवंश कत्तलींसाठी नेत असल्याची गोपनीय माहिती मिळताच पोमके गट्टा (फु.), पोमके चातगाव, पोस्टे कारवाफा, पोस्टे धानोरा इत्यादी ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. यादरम्यान पोमके गट्टा (फु.) येथील बॅरिकेटला धडक मारुन वाहने भरधाव वेगाने निघुन गेले. परंतु पोमके चातगाव येथे नाकाबंदी असल्याने व योग्य समन्वयाने चातगाव येथे कत्तलीसाठी वाहतुक करणाऱ्या दोन ट्रक अडवण्यात आले व तपासणी केली असता ट्रक मध्ये ५२ गोवंश आढळून आले.सदर गोवंशाची सुखरूप सुटका करण्यात आली. याप्रकरणी गोवंश वाहतुक करणाऱ्यांविरुध्द गुन्हा दाखल करुन कारवाई सुरु असून, पुढील तपास गडचिरोली पोलीस दल करीत आहे.
ही कारवाई पेंढरी चे उपविभागीय पोलीस अधिकारी मयुर भूजबळ यांचे नेतृत्वात सपोनि संतोष पाटील, पोउपनि प्रकाश चौधरी पोमके चातगाव तसेच पोहवा अमोल धात्रक, पोहवा शंकर मट्टामी, पोना सुधाकर दंडिकवार, पोशि शरद जाधवर, पोशि पंकज नाडमवार, पोशि प्रभाकर राठोड यांनी केली.