आपला जिल्हा

आदर्श खासदार पुरस्काराने सन्मानित खासदार अशोक नेते यांचा गडचिरोली ऑल मिडीया असोसिएशन चे वतीने सत्कार

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.३० जानेवारी 

पुण्यातील जाधवर ग्रुपच्या वतीने आयोजित सातव्या युवा संसदेत गडचिरोली  चिमूर चे खासदार तथा भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांना आदर्श खासदार म्हणून नुकतेच सन्मानित करण्यात आले. यानिमित्ताने गडचिरोली ऑल मिडीया असोसिएशन चे वतीने त्यांचा आज बुधवारी सकाळी त्यांचे कार्यालयात सत्कार करण्यात आला. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली या युवा संसदेचे उद्घाटन करण्यात आले. तीन सत्रात झालेल्या या युवा संसदेत  सामाजिक चळवळ आणि युवक  सशक्त युवा, सशक्त राजकारण, सशक्त भारत  भारतीय राजकारणाची ७५ वर्षे – किती नैतिक, किती अनैतिक? अशा तीन विषयांवर मंथन करण्यात आले. यावेळी आपल्या भाषणात खा.अशोक नेते यांनी युवकांनी चांगले काम करण्यासाठी चांगले ध्येय ठेवण्यासाठी युवकांना सल्ला दिला. गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात विपरित परिस्थितीमध्ये आणि ७५० किलोमीटर पर्यंत विस्तारलेल्या लोकसभा क्षेत्रात सर्वदूर संपर्क ठेवताना अनेक अडचणी येतात. पण या क्षेत्राच्या संपूर्ण विकासासाठी भविष्यातही ते कार्यरत राहतील, असा विश्वास व्यक्त केला. राजकारण, प्रशासन, न्यायव्यवस्था आणि पत्रकारिता या चार स्तंभाच्या आधारावर आपल्या लोकशाहीचा पाया मजबूत पणे उभा आहे. हे चारही  समाजव्यवस्थेतील महत्वाचे घटक आहेत. राजकारणाकडे सकारात्मक दृष्टिने पाहिल्यास त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतात. त्यामुळे युवा वर्गाने सामाजिक हितासाठी राजकारणात येण्याचे आवाहनही खा.नेते यांनी केले.

अजातशत्रू , शांत, सुस्वभावी, चिवट स्वभावाचे तथा एखादे काम हाती घेतले की ते परिपूर्ण होईपर्यंत पाठपुरावा करणारे दोनदा आमदार आणि दोनदा खासदार म्हणून अशोक नेते यांनी विपरित परिस्थिती असलेल्या भागाचे प्रतिनिधीत्व केले. आपल्या राजकीय प्रवासात त्यांनी या अविकसित क्षेत्रात दळणवळणाच्या सुविधा निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला. याशिवाय रेल्वे, मेडिकल कॉलेज बरोबरचं आरोग्य, शिक्षण, सिंचन क्षेत्रात, महामार्ग या क्षेत्रात उल्लेखनिय योगदान देऊन या भागातील अनेक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी शासन दरबारी पाठपुरावा केला.  या पार्श्वभूमीवर गडचिरोली ऑल मिडीया असोसिएशन चे वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. असं म्हणतात की पत्रकार सामान्यतः राजकीय व्यक्तींचा सत्कार करीत नाही. परंतू या चौथ्या स्तंभाकडून सत्कार केला गेला तर ती राजकीय व्यक्ती जनतेसाठी संवेदनशील पणे कामा करीत असल्याचे समजले जाते. त्यामुळे या सत्काराला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.
गडचिरोली ऑल मिडीया असोसिएशन चे संयोजक हेमंत डोर्लीकर, संदिप कांबळे ज्येष्ठ पत्रकार जयंत निमगडे, अनिल बोदलकर, उदय धकाते, किशोर खेवले, व्यंकटेश दुडमवार, बाळू म्हशाखेत्री, जगदीश कन्नाके सचिन जीवतोडे, नारायण सोनूले यांचे उपस्थितीत खासदार अशोक नेते याचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

 

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!