आपला जिल्हा

गडचिरोलीत कारगील विजय दिवस साजरा

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि २६ जुलै

२६ जुलै हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून देशभर साजरा करण्यात येतो. आज कारगील चौक दुर्गा उत्सव मंडळ च्या वतीने गडचिरोली शहरातील कारगील चौक येथे कारगील विजय दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. अनेक सामाजिक राजकीय नेत्यांनी आदरांजली वाहिली.

कारगील चौक येथे दरवर्षी कारगील चौक दुर्गा उत्सव मंडळाचे अध्यक्ष उदय धकाते यांच्या नेतृत्वात कारगिल विजय दिवस साजरा करण्यात येतो. या ठिकाणी कारगील युद्धात शहीद झालेल्या भारतीय सैनिकांच्या स्मृती निमित्य कारगील स्मारक साकारण्यात आले आहे. या ठिकाणी भारतीय शहीद सैनिकांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे, माजी नगरसेवक प्रमोद पिपरे, मुख्याधिकारी विशाल वाघ, दुर्गा उत्सव मंडळाचे अध्यक्ष उदय धकाते, सचिव प्रकाश भांडेकर, उपाध्यक्ष रेवनाथ गोवर्धन, डॉ. नरेश बिडकर, नरेंद्र चन्नावार,सुनील देशमुख, किशोर सोनटक्के, राजेंद्र साळवे, अभियंता अंकुश भालेराव, प्रफुल आंभोरकर, वासुदेव बट्टे, महेंद्र वाघमारे, आसिफ पठाण, प्रतिष्ठित व्यापारी गोविंद सारडा, मेहर रूपेश सलामे, साहिल गोवर्धन, वैभव रामटेके, आकाश कुळमेथे आदी उपस्थित होते.

नगर परिषद गडचिरोलीतर्फे वैशिष्ठ्यपूर्ण योजना अंतर्गत सदर कारगील स्मारक साकारण्यात आले असून स्मारकाचे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. जिल्ह्यात पूरपरिस्थिती असल्याने स्मारकचे लोकार्पण पुढे ढकलण्यात आले आहे. पुढील महिन्यात या स्मारकाचे लोकार्पण होणार आहे. गुरुदेव उच्च प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी कारगील स्मारकाला भेट देऊन शहीद सैनिकांना आदरांजली देऊन विजयाचा जय घोष केला.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!