आपला जिल्हा
२८ जुलै ला नगरपरिषदेची आरक्षण सोडत
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि २५ जुलै
गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली व देसाईगंज नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणूकी संबंधाने राज्य निवडणूक आयोगाने जाहिर केलेल्या सुधारित कार्यक्रमानुसार नगरपरिषदांच्या सदस्य पदांच्या आरक्षणाची सोडत काढणे. नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण (महिला) यांचे आरक्षण २८ जुलै रोजी सोडत पध्दतीने निश्चित करण्यात येणार आहे.
गडचिरोली व देसाईगंज नगरपरिषदांच्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आरक्षण व सोडत प्राधिकृत केलेल्या उप विभागीय अधिकारी/उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. इच्छुक नागरिकांनी आरक्षण निश्चितीच्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.