आपला जिल्हा

अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या जिल्ह्यातील आगमना प्रसंगी जबाब दो आंदोलन

आंदोलकांनी सरकारचा केला तीव्र निषेध

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.९ जानेवारी 

३५ दिवसा पासुन बेमुदत काम बंद आंदोलन करुनही सरकार मागण्या मान्य करत नसल्याने संतप्त असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा जिल्ह्यातील आगमना प्रसंगी जबाब दो आंदोलन करन्यात आले. यावेळी आंदोलकांनी सरकारचा तीव्र निषेध केला.

किमान २६ हजार रु वेतन, ग्रॅच्यूइटी, ५ हजार रु पेन्शन देण्यात यावी या मागण्या घेऊन हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमानात तैनात करण्यात आला होता.
महिला सक्षमीकरणाच्या बाता करणारे सरकार अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याने महिलांच्या मनात प्रचंड संताप निर्माण झालेला आहे. गडचिरोली च्या मुख्य रस्त्यावर अभिनव लॉन जवळ आंदोलन करन्यात आले.
या आंदोलनात कॉ.रमेशचंद्र दहिवडे, कॉ.अमोल मारकवार, कॉ.अरुण भेलके, कॉ.डॉ.धर्मराव सोरदे, उज्वला उंदिरवाडे, कौशल्य गोरकार, सुशीला मंगरे,योगिता मुनघाटे,सुनंदा बावने,छाया कागदेलवार, अर्चना ढवळे, माधुरी चुनारकर, अर्चना रामटेके,राजश्री लेखामी कॉ.फकिराजी ढेंगणे,प्रेमिला झाडे ईत्यादी सेविका सह आठशेहून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या. आंदोलनात शेकाप चे भाई रामदास जराते, अक्षय कोसनकर, बिआरएसपी चे राज बन्सोड, आदिवासी युवा संघटनेचे कुनाल कोवे, रिपब्लिकन पक्षाचे उंदिरवाडे यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला. कॉ.अमोल मारकवार यांनी मागण्यांचे  निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!