विशेष वृतान्त

गुंडापुरीतील तिहेरी हत्याकांडात नऊ आरोपींना अटक; जादुटोण्याच्या संशयातूनच आजी आजोबा आणि नातीची हत्या

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. १३ डिसेंबर 

भामरागड तालुक्यातील नक्षलदृष्टया अतिसंवेदशिल असणाऱ्या पबुर्गी (येमली) ोपोलीस मदत केंद्र हद्दीतील जंगल व्याप्त गुंडापुरी येथील शेतशिवारातील झोपडीत ६ डिसेंबर रोजी आजी, आजोबा आणि नातीच्या भीषण हत्याकांडातील ९ आरोपींना पोलिसांनी अटक करण्यात यश मिळवले आहे.

देवु कुमोटी, वय ६०, बिच्चे देवु कुमोटी, वय ५५, अर्चना तलांडी, वय १० या तिघांचीही अत्यंत निर्दयीपणे लोखंडी हातोडा व धारदार सुरीने गळा कापुन हत्या केल्याची केली होती. मृतकाचा मुलगा विनु देवु कुमोटी याने दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन आलदंडी येथे गुन्हा नोंद करण्यात आला. एकाच रात्री अज्ञात इसमांनी तिघांचीही निघून हत्या केल्याने संपुर्ण गडचिरोली जिल्हा हादरला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पीएलजीए सप्ताह सुरू असताना अहेरीचे अप्पर पोलीस अधीक्षक एम. रमेश यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेने सलग पाच दिवस तपास करुन गुन्हा उघडकीस आणला आणि नऊ आरोपींना अटक केली.

गावकऱ्यांच्या दबावाखाली मृतकाची मुले नाइलाजाने हत्याकांडात सहभागी झाली
जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सांगितले की गावातील मृत्यूंचे कारण देवू आहे.त्यामुळे त्याला संपविले तर मुद्दाच संपुष्टात येईल. यासाठी गावकऱ्यांनी दोन तीन वेळा गावात बैठका घेऊन देवूला मारण्यासाठी पुढाकार घ्यावा असा दबाव आणला. त्यामुळे रमेश आणि विनू कुमोटी यांनी गावात वडीलांमुळे आपल्या कुटुंबाला त्रास सहन करावा लागत आहे.या भावनेतून नाइलाजाने हत्याकांडात सहभाग घेतला.

उल्लेखनीय आहे की देवू कुमोटी हा गावातील पुजारी होता. त्याने मागिल अनेक वर्षे स्थानिक लोकांवर उपचार करुन त्यांना बरे केले होते. परंतु अलीकडच्या काळात त्याचे झाडफूकीनंतर आजारी लोकांचे मृत्यू होत होते परिणामी लोकांच्या आजारपणास आणि मृत्युला देवू कुमोटी हाच कारणीभूत असल्याचे मानुन मृतकाची मुले रमेश कुमोटी, विनु कुमोटी (फिर्यादी) तसेच त्याचे नातेवाईक,जोगा कुमोटी, गुना कुमोटी, राजु आत्राम ( येमला), नागेश उर्फ गोलु येमला, सुधा येमला, कन्ना हिचामी सर्व रा. गुंडापुरी, आणि मृतकाचा जावई तानाजी कंगाली, रा. विसामुंडी, ता. भामरागड, यांनी कट रचुन मृतक देवू  कुमोटी याचे डोक्यावर हातोडीने जोरदार प्रहार करुन व मृतकाची पत्नी बिच्चे कुमोटी हिचा धारदार सुरीने गळा कापुन निघून
हत्या केली. घटनेच्या दिवशी मृतकाची नात अर्चना तलांडी, रा. मरकल ही मृतकां सोबत असल्याने ती आपल्याला ओळखुन पोलीसांना माहीती देईल. या भितीने आरोपींनी मागचा पुढचा विचार न करता तिची देखील हत्या केल्याचे तपासा दरम्यान निष्पन्न झाल्यानंतर या सर्व नऊ आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले. गुरुवारी सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले जाणार आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल बसू यांनी बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

जादुटोण्याच्या संशयातूनच हत्या
मृतक देवु कुमोटी हा या परिसरातील मोठा पुजारी असुन तो जादुटोना करुन अनेक लोकांना आजारी पाडत असल्याने त्या लोकांचा पुढे मृत्यु होतो. असा संशय गुंडापुरी व परिसरालगत असलेल्या काही गावांमध्ये होता. तपासात दिसून आले की, अलिकडच्या काळात या परिसरात जे व्यक्ती मृत्युमुखी पडले ते कॅन्सर व अन्य गंभीर आजारांनी ग्रस्त असतांना देखील त्यांचे नातेवाईकांनी त्यांना वैदयकिय उपचार न देता वेगवेगळ्या पुजाऱ्यांकडे नेल्याने त्यांच्या प्रकृतीत जास्त बिघाड होवुन ते मृत्युमुखी पडले. परंतु त्या मृतकांच्या नातेवाईकांचा मृतक देवू कुमोटी हा जादू टोना करीत असल्याची धारणा असल्याने त्याचे बद्दल प्रचंड प्रमाणात रोष होता. या संदर्भात
गावात यापुर्वी दोन ते तिन वेळा पंचायत बोलावुन त्या पंचायत दरम्यान मृतक देवू कुमोटी यास त्याचेच नातेवाईक
असलेल्या परिवाराकडुन समज देण्यात आली होती.
शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!