आपला जिल्हाताज्या घडामोडी

आजपासून अंगणवाडी कृती समितीचा राज्यव्यापी बेमुदत संप

हजारो अंगणवाडी महिलांनी दिले जिल्हापरिषदेवर धरणे

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.४ डिसेंबर 

अंगणवाडी महिलांच्या प्रश्नांना घेऊन अंगणवाडी कृती समितीचे वतीने ४ डिसेंबर पासून राज्यव्यापी बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. राज्यातील लोन लाख अंगणवाडी महिला या संपात सहभागी झाल्या आहेत. अशी माहिती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड अमोल मारकवार यांनी दिली आहे.

अंगणवाडी महिलांना कर्मचाऱ्याचा दर्जा दया, तो पर्यंत किमान वेतन २६००० रुपये देण्यात यावे, अंगणवाडी महिलांना मानधनाचे निम्मे पेंशन तथा ग्रॅच्यूइटी देण्यात यावी. या प्रमुख मागणीला घेउन बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. संपाच्या पहिल्याच दिवशी हजारो अंगणवाडी महिलांनी जिल्हा परीषदे समोर संघटनेच्या वतीने धरणे देण्यात आले. एक हजाराहून जास्त अंगणवाडी महिला या धरणे कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. महिलांना किमान वेतन सव्वीस हजार रुपये मिळालेच पाहीजे, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करुन अंगणवाडी महिलांना ग्रॅच्यूइटी लागू करा, मानधनाचे निम्मे पेंशन मिळालंच पाहीजे, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. मार्गदर्शन करताना भाषणात प्रा. दहीवडे म्हणाले जनतेने निवडून दिलेल्या आमदार, खासदाराच्या भविष्याचा विचार करुन त्यांना पेंशन दिली जाते. परंतु हेच खासदार, आमदार जनतेच्या भविष्याचा विचार करीत नाही. केवळ आश्वासन देतात परंतु त्यांची अंमलबजावणी केल्या जात नाही. पेंशन तथा ग्रॅच्यूइटी देण्यात येईल. असे आश्वासन विधान सभेत देण्यात आले. त्याला आठ महिण्याचा काळ लोटला परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही. अंमलबजावणी झाली पाहीजे याच मागणीला घेऊन हा बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. भाकपचे नेते अमोल मारकवार म्हणाले कामगाराला संघर्षा शिवाय काहीच मिळत नाही. देशात लोकशाही असली तरी या लोकशाहीचे भांडवलशाहीत रुपांतर झाले आहे. आणि म्हणूनच गरीव दिवसेंदिवस गरीब होतांना पहावयास मिळते. तर भांडवलदार अती श्रीमंत होत आहे. गोरगरीब जनतेवरील अन्याय सतत वाढत आहे. त्याचा विरोध केला तर तो दुर करण्याऐवजी सरकारची दडपशाही दिवसेंदिवस वाढत आहे. या दडपशाहीचा संघटीतरीत्या आपण प्रतिकार केला पाहीजे असे प्रतिपादन केले.
प्रमोद गांडवाटे, अरुण भेलके, राजेश पिंजरकर यांचे ही मार्गदर्शनपर भाषणे झाली. धरणा कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता भारती रामटेके, कौशल्या गौरकार, ज्योती बेंजकीवार, छाया कागदेलवार, सुशिला कार, सुनंदा बावणे, सुमन तोकलवार, सुनंदा उईके, योगांता मुनघाटे, यांनी विशेष परीश्रम घेतले.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!