आपला जिल्हा

एका महिला नक्षलीसह तीन नक्षलवाद्यांना अटक ; गडचिरोली पोलिसांची कारवाई

१० लाखांचे होते बक्षीस

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि २८ ऑगस्ट

गडचिरोली पोलीस शोध मोहीम राबवीत असतांना दोन वेगवेगळ्या ठिकाणावरून एका महिला नक्षलीसह ३ नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली. ही कारवाई विशेष अभियान पथक सी-६० व सीआरपीएफ बटालियन-३७ च्या जवानांनी केली.

जिल्ह्यातील भामरागड उपविभागांतर्गत येणाऱ्या लाहेरी पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील कोयार जंगल परिसरात विशेष अभियान पथक (सी-६०) व सीआरपीएफ बटालियन-३७ चे जवान नक्षल विरोधी अभियान राबवीत असतांना २ नक्षलवाद्यांना तर हेडरी उपविभागांतर्गत गट्टा जांभिया हद्दीतील झारेवाडा जंगल परीसरात एका नक्षलवाद्यांस अटक करण्यात गडचिरोली पोलिसांना यश मिळाले. या तिघांवर एकूण १० लाख रुपयांचे बक्षीस शासनाने जाहीर केले होते.

कोयार जंगल परीसरामधून रमेश पल्लो (२९) रा. कोयार ता. भामरागड, तानी ऊर्फ शशी चमरु पुंगाटी (२३) रा. पद्दुर ता. भामरागड या नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली असून दोघांवरही ४ लाखांचे बक्षीस होते. तर झारेवाडा जंगल परीसरामधून अटक करण्यात आलेल्या अर्जुन ऊर्फ महेश रैनु नरोटे (२७) रा. झारेवाडा ता. एटापल्ली याचेवर २ लाख रुपये बक्षीस शासनाने जाहीर केले होते.

रमेश पल्लो हा सन २०१९ मध्ये नक्षलमध्ये भरती होवुन कंपनी १० चा एक्शन टीम मेंबर व स्कॉऊट टीम मेंबर म्हणुन कार्यरत होता. त्याचा ३ हत्या, ८ चकमक, १ जाळपोळ, १ इतर अशा एकुण १३ गुन्ह्यामध्ये सहभाग होता. तानी ऊर्फ शशी चमरु पुंगाटी ही सन जुलै २०१५ मध्ये नक्षलमध्ये भरती झाली. २०१६ ते २०१९ पर्यंत प्लाटुन क्र ७ मध्ये तर २०१९ ते आतापर्यंत कंपनी क्र. १० मध्ये सदस्य पदावर कार्यरत होती. तिचा ४ खून व ३ चकमक अशा एकुण ७ गुन्हामध्ये समावेश होता.

तर अर्जुन ऊर्फ महेश रैनु नरोटे २०१० साली पेरमिली दलम सदस्य पदावर भरती होवुन २०१३ पर्यंत कार्यरत होता. त्यानंतर प्लॉटुन क्र. १४ मध्ये कार्यरत व ऑगस्ट २०१३ पासून २०१८ पर्यंत सिरोंचा दलममध्ये सदस्य पदावर कार्यरत होता. मे २०१८ पासुन ते आजपर्यंत तो भामरागड दलममध्ये कार्यरत होता. तो ७ खुन, ९ चकमक, २ जाळपोळ, २ दरोडा, १ जबरी चोरी व इतर ३ अशा एकुण २४ गुन्ह्यामध्ये सहभागी होता.

गडचिरोली पोलीस दलाने राबविलेल्या प्रभावी नक्षलविरोधी अभियानामुळे मागील दोन वर्षाच्या कालावधीत आतापर्यंत ५७ नक्षलवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश मिळाले आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!