ताज्या घडामोडीदेशविदेशराजकीय

कालेश्वरम् प्रोजेक्ट हे तर के सी आर एटीएम : राहुल गांधींचा जोरदार हल्लाबोल

आंबटपल्ली येथे कांग्रेसची सभा

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. २ नोव्हेंबर 

तेलंगणा विधानसभा निवडणुकीत सर्वात
महत्वपूर्ण मुद्दा बनलेल्या महाराष्ट्र – तेलंगणा सीमेवरील मेडिगड्डा धरणाला २ नोव्हेंबर रोजी सकाळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या तेलंगणातील आंबटपल्ली येथील सभेच्या दरम्यान भेट दिली. यावेळी त्यांनी तेलंगणा केसीआर सरकारवर कडाडून तोफ डागली. सिंचनाच्या नावाखाली सरकारने शेतकऱ्यांची लूट केली, असा घणाघाती आरोप त्यांनी केला.

राहुल गांधींची खोचक टीका, म्हणाले, हे तर कालेश्वरम् के सी आर एटीएम

या घोटाळ्यावर प्रकाश टाकण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी कार्यक्रमस्थळी उभारलेल्या ‘कालेश्वरम एटीएम’कडे बोट दाखवत राहुल गांधी यांनी ‘कालेश्वरम केसीआर एटीएम’ असे नामकरण करण्याची सूचना करुन खोचक टीका केली. काँग्रेसची सत्ता आल्यास केसीआर व त्यांच्या कुटुंबीयांनी या धरणात केलेल्या गैरव्यवहाराची रक्कम जनतेला परत मिळवून देईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

महाराष्ट्र – तेलंगणा सीमेवरील सिरोंचाजवळील गोदावरी नदीवरील मेडिगड्डा धरणावरील एक किलोमीटर लांब असलेल्या पुलाचे तीन खांब खचले होते, त्यामुळे महाराष्ट्र – तेलंगणाला जोडणारा हा मार्ग आठ दिवसांपासून वाहतुकीसाठी बंद केलेला आहे.
तेलंगणातील विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत
पूल खचल्याने विरोधकांना हल्ला करण्यासाठी मुद्दा मिळाला आहे. भाजप व काँग्रेसने केसीआर यांच्यावर टीकेची झोड उठवत या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित करुन कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला.

दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी
गुरुवारी कालेश्वरम उपसा सिंचन प्रकल्पाचा भाग
असलेल्या मेडिगड्डा (लक्ष्मी) धरणाला भेट दिली. तेलंगणात प्रचार दौऱ्यावर असलेले राहुल गांधी
हैदराबादहून हेलिकॉप्टरने जयशंकर भूपालपल्ली
येथील आंबटपल्ली गावातून धरणावर पोहोचले.
यावेळी त्यांनी तडे गेलेल्या पुलाची पाहणी केली.
तेलंगणा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष ए. रेवंत रेड्डी, विधिमंडळ नेते मल्लू भट्टी विक्रमार्का, आमदार
श्रीधर बाबू आणि इतर नेते त्यांच्यासमवेत होते.

महिलांशी साधला संवाद
बॅरेजला भेट देण्यापूर्वी त्यांनी तेलंगणातील आंबटपल्ली गावात महिलांच्या सभेला संबोधित केले. त्यांनी केसीआर सरकारचा सर्वात मोठा घोटाळा म्हणून
कालेश्वरमचे वर्णन केले. “मला हे वैयक्तिकरित्या
पहायचे होते आणि म्हणूनच मी येथे आलो आहे,” असे
ते म्हणाले. या प्रकल्पात मुख्यमंत्री केसीआर यांनी
तेलंगणातील जनतेकडून एक लाख कोटी रुपयांची लूट
केल्याचा आरोप त्यांनी केला. तर, या प्रकल्पाचा
लोकांना फायदा झाला नसल्याचा दावाही त्यांनी केला.
शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!