आपला जिल्हाविशेष वृतान्त

शहिदांच्या स्मृतींना उजाळा : गडचिरोली पोलीस दलाने उपपोस्टे लाहेरी येथे उभारले शहिद स्मारक

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.८ आक्टोंबर 

८ ऑक्टोंबर २००९ रोजी माओवाद्यांच्या हल्यामध्ये गडचिरोली पोलीस दलाच्या एक अधिकारी व १६ जवान शहिद झाले होते. त्यांच्या स्मरणार्थ गडचिरोली पोलिसांनी लाहेरी उप पोलीस स्टेशन येथे रविवारी शहीद स्मारकाचे अनावरण केले. जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल बसू यांनी शौर्य स्थळ व शहिद स्मृती स्मारकाचे फीत कापून व दीप प्रज्वलन करुन अनावरण केले . त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांनी शहिद स्मारकास पुष्पगुच्छ अर्पण करुन व दीप प्रज्वलन करुन श्रद्धांजली अर्पण केली.

बरोबर १४ वर्षांपूर्वी ऐन विधानसभा निवडणुकीच्या काळात नक्षलवाद्यांनी पहाटेच्या सुमारास लाहेरी उप पोलीस स्टेशन वर हल्ला केला. या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पीएसआय सी. एस. देशमुख, भुसारी व रामा कुडीयामी या नक्षलविरोधी अभियान पथक सी-६० कमांडरच्या नेतृत्वात ५० जवानांचे पथक पहाटे पाचच्या सुमारास पोलीस स्टेशन च्या मागिल बाजूस असलेल्या मुरंगल पहाडीची तपासणी करीत काळागोटा ते मलमपोडूर दरम्यान नक्षल शोध अभियान करीत निघाले. सकाळी १० वाजताच्या सुमारास मुख्य रस्त्यावर उतरून बाहेर पडायचे आणि पोलीस स्टेशन ला जायचे असा विचार करीत असतानाच नक्षलवाद्यांनी मलमपोडूर च्या जंगलातून जोरदार हल्लाबोल केला. जवळजवळ ३५० नक्षलवाद्यांनी या जवानांना तीन बाजूंनी घेरले होते. त्यामुळे मर्यादित संख्या असलेल्या सी -६० जवानांचा त्यांचेपूढे टिकाव लागणे कठीण होते. नक्षलवाद्यांनी गोरिल्ला युद्धनीतीचा यावेळी यशस्वी वापर केला. यात पीएसआय देशमुख सह १७ जवान शहीद झाले. दरम्यान एकाकी झुंज देणाऱ्या जवानांनी सहा ते सात नक्षलवाद्यांना यमसदनी पाठवले. या घटनेचा तीव्र धक्का कमांडर रामा कुडीयामी यांना बसला व त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आणि काही कालांतराने त्यांचेही देहावसान झाले.

त्यांची शहादत ही प्रेरणादायी ठरावी यासाठी १४ वर्षांनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल बसू यांनी लाहेरी येथे शहिदांच्या स्मरणार्थ शौर्य स्थळ आणि स्मृती स्मारक उभे केले.

या कार्यक्रमास पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक कुमार चिंता, यतिश देशमुख सीआरपीएफ बटा.३७ चे कमांडंट खोब्राागडे भामरागड चे एसडीपीओ नितीन गणापूरे व इतर वरिष्ठ अधिकारी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी, आश्रम शाळा लाहेरी येथील शिक्षक वृंद व विद्यार्थी, येरकलवार गुरुजी व गावातील प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता उपपोस्टे लाहेरीचे प्रभारी अधिकारी संतोष काजळे, पोउपनि. प्रशांत डगवार, पोउपनि. अभिजीत काळे, पोउपनि. सचिन सरकटे व सर्व अंमलदार, सिआरपीएफचे असिस्टंट कमांडंट अशोक कुमार, पोनि. शीतला प्रसाद तसेच एसआरपीएफ ग्रुप ७ चे अधिकारी व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!