आपला जिल्हा

देसाईगंजमधील दोन विद्यार्थिनी शाळेतून बेपत्ता

विविध शंका कुशंकांना पेव!

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.४ आक्टोंबर 

देसाईगंज शहरातील आदर्श न्यू इंग्लिश हायस्कूलच्या दोन अल्पवयीन विद्यार्थिनी मंगळवार ३ ऑक्टोबर पासून शाळेतून अचानक गायब झाल्याने खळबळ माजली आहे. यामुळे अनेक शंका कुशंकांना पेव फुटले आहे.

कांचन वंजारी व रेशमा धोटे अशी बेपत्ता विद्यार्थिंनींची नावे आहेत. कांचन ही सातव्या, तर रेशमा ही दहाव्या वर्गात शिकत आहे. काल सकाळी त्या शाळेत गेल्या. परंतु शाळा सुटल्यानंतरही त्या घरी पोहोचल्या नाही. यासंदर्भात शाळा प्रशासनाला माहिती दिल्यानंतर त्यांनी सीसीटीव्ही फूटेज तपासले. त्यात दोघीही दुपारी १ वाजताच्या सुमारास अल्प विश्रांतीच्या काळात बाहेर पडताना दिसून आल्या. कुटुंबीयांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिस निरीक्षक किरण रासकर यांनी दिली.

दोन्ही विद्यार्थिनी भगतसिंह वॉर्डातील रहिवासी असून, शेजारीच राहतात. त्या अचानक गायब झाल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली असून, देसाईगंज पोलिस तपास करीत आहेत.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!