आपला जिल्हाताज्या घडामोडी

आदिवासींच्या चक्काजाम आंदोलनात आमदार डॉ देवराव होळींसह लोकप्रतिनिधींचा तीव्र निषेध

जिल्ह्यातील मंत्री, खासदार आणि आमदार आंदोलनात सहभागी होईपर्यंत चक्काजाम सुरू ठेवण्याचा निर्धार

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. १ आक्टोंबर 

धनगरांचा आदिवासींमध्ये समावेश करुन त्यांना आरक्षण देण्याच्या राज्य सरकारच्या भूमिकेविरोधात रविवारी गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी समुहाने शहरातील गांधी चौकात केलेल्या चक्काजाम आंदोलनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, स्थानिक आमदार डॉ. देवराव होळी आणि आंदोलनात अनुपस्थित जिल्ह्यातील आदिवासी खासदार अशोक नेते, आदिवासी मंत्री धर्मराव आत्राम आणि आमदार गजबेंचा तीव्र शब्दांत निषेध केला. आणि अनुपस्थित आदिवासी लोकप्रतिनिधी जोपर्यंत आंदोलन स्थळी येत नाहीत, तोपर्यंत चक्काजाम आंदोलनात सुरूच ठेवण्याचा निर्धार केला आहे.

धनगरांना आदिवासींमध्ये समाविष्ट करण्यात मुळ आदिवासींचा प्रचंड विरोध आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून हा विरोध सुरू आहे. रविवारी याविरोधात गडचिरोली जिल्ह्यातील मुळ आदिवासींनी जिल्हा केंद्रावर येऊन सरकारच्या भूमिकेविरोधात चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. यात गडचिरोली जिल्ह्यातील सर्व आदिवासी समाजाचे लोकप्रतिनिधी यात आजी माजी मंत्री, खासदार, आमदार यांनी सहभागी होऊन आदिवासींच्या भावना सरकार पर्यंत पोहोचवाव्या असे आवाहन केले होते.
दुपारी एक वाजताच्या दरम्यान जिल्ह्यातील आंदोलक गांधी चौकात पोहोचले. तेव्हा गडचिरोलीचे आमदार रेस्ट हाऊसमध्ये बसून राहिले परंतु ते आंदोलन स्थळी आले नाहीत. त्यामुळे संतप्त आंदोलनकर्त्यांनी मोठमोठ्या निषेधाच्या घोषणा देताच डॉ. होळी सहभागी झाले. तरीही त्यांचा आणि सरकारचा निषेध सुरूच होता. यावेळी आंदोलनकर्त्यांनी विकास कोणाचा आमदार खासदारांचा, आदिवासींचा विकास कुठे आहे असा प्रश्न उपस्थित केला. एक तीर एक कमान, आदिवासी एक समान एकनाथ शिंदे मुर्दाबाद, डॉ. होळी मुर्दाबाद अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. बातमी लिहेपर्यंत आंदोलन सुरूच होते. समाज एकत्र येऊन मागणी करीत असताना लोकप्रतिनिधींची भूमिका काय असावी असा प्रश्नही आंदोलनकर्त्यांनी यावेळी केला.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!