राष्ट्रवादीचे अध्यक्ष अतुल गण्यारपवार यांच्या गडचिरोलीत प्रथमागमन प्रसंगी जंगी स्वागत.

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. २० जुलै
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ( मुळ ) च्या गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी अतुल गण्यारपवार यांची नियुक्ती झाल्यानंतर आज गुरुवारी त्यांच्या गडचिरोली शहरात प्रथम आगमन झाले. गण्यारपवार यांच्या नियुक्तीने जिल्ह्यातील त्यांच्या कार्यकर्ते व स्नेहीजनांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे या कार्यकर्दित्यांनी आज गुरुवारी गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौकात नगरपालिकेचे माजी सभापती तथा शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष विजय गोरडवार यांचे नेतृत्वात अनेक कार्यकर्त्यांसह अतुल गण्यारपवार यांचे शहरात आगमन होताच ढोलताशाच्या गजरात व आतिषबाजीसह शाल, श्रीफळ देऊन जंगी स्वागत करण्यात आले.
यावेळी नईम शेख, विजय धकाते, जिल्हा बँकेचे संचालक अमोल गण्यारपवार, घोट भातगिरणीचे अध्यक्ष करण गण्यारपवार, माजी जि प सदस्य राजू आत्राम, युवा शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अमोल कुळमेथे, युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद पवार, भास्कर निमजे, माजी नगरसेविका संध्या उईके, मीनल चिमूरकर, महिला जिल्हा सरचिटणीस सुषमा येवले, तालुकाध्यक्ष महिला नीता बोबाटे, सेवादल तालुकाध्यक्ष सुनील कत्रोजवार, राजू डांगेवार, संतोष जुमनाके, मल्लया कालवा, सुनिल चिमुरकर, प्रफुल्ल लोणारे, संजु मेश्राम, निलेश कोटगले, शेखर मडावी, दिवाकर उंदीरवाडे, मुरलीधर मेश्राम, नरेश कंदिकुरवार , बंडू एलावार, विनोद शेंगर, मधुकर चिंतलवार, भोवरे पाटील, कबीर आभारे, आरती कोल्हे, माया आक्केवार, कल्पना ईप्पावार, बेबी लभाने, प्रतिमा सोरते, सुनिता मेश्राम, यांचेसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.