विशेष वृतान्त
५ जुलै ला राष्ट्रपती गडचिरोलीत !
गोंडवाना विद्यापीठाच्या पदवीदान समारंभासह इतर कार्यक्रमात होणार सहभागी

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.२० जून
आगामी ५ जुलै रोजी भारताचे महामहीम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू गडचिरोलीत येणार आहेत. गोंडवाना विद्यापीठाच्या पदवीदान समारंभासह अन्य कार्यक्रमातही त्या सहभागी होणार आहेत. कुलगुरू डॉ प्रशांत बोकारे यांचेशी एका औपचारिक चर्चेत त्यांनी सदर माहिती दिली. गडचिरोली जिल्ह्याच्या इतिहासात देशाच्या राष्ट्रपतींचा हा पहिलाच दौरा ठरणार आहे. गोंडवाना विद्यापीठ प्रशासनासह जिल्हा प्रशासन या दौऱ्याच्या कामी लागले असून दरम्यानच्या कालावधीत शहराची सुरक्षाव्यवस्था चाकचौबंद ठेवण्यात येणार असल्याचे समजते.