आपला जिल्हाआरोग्य व शिक्षण

गोंडवाना विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या अधिष्ठाता पदावर डॉ. अनिल चिताडे यांची निवड

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.२४ मे

गोंडवाना विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या अधिष्ठाता पदावर  विद्यापीठाचे विद्यमान परिक्षा नियंत्रक डॉ. अनिल चिताडे यांची निवड करण्यात आली आहे. कुलगुरू तथा निवड समितीचे प्रमुख डॉ. प्रशांत बोकारे यांनी बुधवारी ही माहिती दिली. गुरुवारी यासंदर्भात विद्यापीठाकडून प्रसिद्धी पत्रक जारी केले जाईल.

विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या अधिष्ठाता पदासाठी मंगळवारी झालेल्या मुलाखतीत सहा जणांनी उपस्थित राहून मुलाखत दिली. यात तक्रारकर्ते डॉ.मनोहर लोखंडे यांचा समावेश होता. तर परिक्षा नियंत्रक डॉ. अनिल चिताडे, संपूर्ण प्रक्रियेवर आक्षेप घेत तक्रार करणारे डॉ. मनोहर लोखंडे, डॉ.अमृत लंजे, डॉ. चंद्रकांत डोर्लीकर, डॉ. राजेश ठोंबरे आणि डॉ. अजय कोल्हे  हे सुद्धा. उपस्थित होते.

अधिष्ठाता विज्ञान व तंत्रज्ञान या पदासाठी एकूण १३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यातील गणेश काकंडीकर, ज्ञानेश्वर गायधने, इंद्राणी शर्मा, अभय सोळंके, वैभव देशमुख आणि मनीष उत्तरवार यांचे अर्ज अवैध ठरविण्यात आल्याचे समजते. हे सर्व जण गैरहजर राहिले. तर वैध ठरलेल्या अर्जदारांपैकी डॉ. चंद्रशेखर साखले हे अनुपस्थित राहिले होते.

ऑगस्ट २०२२ मध्ये झालेल्या पहिल्या जाहिरातीमध्ये विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी डीन, विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखा या पदासाठी अपात्र उमेदवाराची निवड केली आहे आणि हे प्रकरण अद्याप मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रलंबित आहे. त्यात पुन्हा जाहिरात देऊन नव्याने प्रक्रिया राबवावी असे न्यायालयाने कुठेही म्हटले नाही. आणि न्यायालयाचा निकाल जर याचिकाकर्त्याच्या बाजूने लागला तर विद्यापीठाला ते पद रिक्त करून याचिकाकर्त्यांना त्याच पदावर पुनर्स्थापित करावे लागेल असे म्हटले आहे. त्यामुळे मंगळवारी झालेल्या मुलाखतीनंतर नव्याने आलेल्या अधिष्ठात्याच्या समोर कधीही पद सोडावे लागण्याचे सावट राहील की काय अशीही चर्चा आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!