विशेष वृतान्त

आदिवासी शेतकऱ्याच्या आत्महत्येला जिल्हाधिकारी जबाबदार! 

जिल्हाधिकाऱ्यांसह दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची शेकाप आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची मागणी 

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली 

३१ ऑगस्टरोजी एटापल्ली तालुक्यातील मलमपाडी गावातील आदिवासी शेतकरी अजय टोप्पो याच्या आत्महत्येला जिल्हाधिकारी संजय मीना कारणीभूत असून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. अशी मागणी मृत शेतकऱ्याचे कुटुंबीय पत्नी उर्मिला टोप्पो, मुलगा रोशन टोप्पो, वडील दिलराम टोप्पो, भाऊ जगतपाल टोप्पो यांचेसह शेकाप आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, सुरजागड पारंपारिक इलाक्याचे प्रमुख, माजी जि.प.सदस्य सैनू गोटा,ॲड.लालसू नोगोटी, मलमपाडी ग्रामसभा अध्यक्ष अशोक बडा, सुरजागडच्या माजी सरपंच कल्पना आलाम यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली.

एट्टापल्ली तालुक्यातील मलमपाडी येथील आदिवासी शेतकरी अजय दिलराम टोप्पो (३८) यांनी ३१ ऑगस्ट २०२२ रोजी सुरजागड लोह खाणीतून पावसामुळे वाहून येणाऱ्या लाल गाळ साचल्याने धान पिकाचे नुकसान झाल्यामुळे शासनाने मदत द्यावी अशी मागणी घेऊन मंगेर येथे जिल्हाधिकारी संजय मीना यांच्याकडे गेले होते. परंतु जिल्हाधिकारी संजय मीना यांनी, तुम्हाला वनहक्क दावा मंजूर होऊ शकत नाही, तुम्ही आदिवासी नाहीत त्यामुळे आज ना उद्या तुम्हाला ही जमीन सोडून द्यावी लागणार असे उत्तर दिले. या उत्तराने दुखावलेल्या अजय टोप्पो यांनी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली.
अजय टोप्पो यांची आत्महत्या जिल्हा प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या असंवेदनशील कार्यपद्धतीमुळे झाली आहेत. मात्र, पोलिस विभागाच्या मदतीने दबाव टाकून सदर आत्महत्या दडपून टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. शुक्रवारी हेडरी पोलिसांनी नातेवाईकांना बोलविले आणि सर्वांच्या कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या. त्यावर पोलिसांनी काय लिहिले हेही आम्हाला सांगितले नाही. असे मृतकाचा भाऊ जगतपाल यांनी सांगितले. अजयची आत्महत्या जिल्हाधिकाऱ्यांच्या असंवेदनशील वागण्यामुळे झाला आहे. त्यामुळे त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. असा ठराव मलमपाडी ग्रामसभेने देखील घेतला आहे. पत्रपरिषदेला शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते, जयश्री वेळदा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव काॅ. अमोल मारकवार, सुरजागड पारंपारिक इलाक्याचे प्रमुख, माजी जि.प.सदस्य सैनू गोटा,ॲड.लालसू नोगोटी, मलमपाडी ग्रामसभा अध्यक्ष अशोक बडा, सुरजागडच्या माजी सरपंच कल्पना आलाम, मंगेश नरोटे, तुकाराम गेडाम उपस्थित होते.

 

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!