आपला जिल्हाराजकीय

आष्टी ग्रामपंचायतीच्या गाळे बांधकामातील भ्रष्टाचाराची फेर चौकशी करा अन्यथा आमरण उपोषण

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष राहुल डांगे यांचा इशारा

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. १२ मार्च

गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी ग्रामपंचायत मधील २०१८ ते २०२१ या कालावधीत निर्माण करण्यात आलेल्या व्यावसायिक गाळे बांधकामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असून त्याच्या चौकशीची मागणी केल्यानंतर पंचायत समिती स्तरावरुन थातूरमातूर चौकशी करीत भ्रष्टाचाऱ्यांना वाचविण्याचे काम करण्यात आले. मात्र या चौकशी अहवालावरून समाधान न झाल्याने या भ्रष्टाचाराची प्रभावी आणि पारदर्शी फेर चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आष्टी शहर अध्यक्ष राहुल डांगे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे. सदर प्रकरणी योग्य चौकशी न झाल्यास १ एप्रील पासून आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे.

आष्टी या जिल्ह्यातील मोठ्या ग्रामपंचायती मध्ये सन २०१८ ते २०२१ या कालावधीत नियम धाब्यावर बसवून व्यावसायिक इमारतीच्या ४० ते ४४ गाळ्यांचे बांधकाम केले. या बांधकामासाठी इ निविदा प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे होते. ती केली नाही. तीन कोटेशन वर कोट्यवधी चे काम दिले. योग्य इस्टीमेट केले नाही, बांधकामाचा दर्जा सुमार आहे. गाळेधारकांकडून आलेली अनामत रक्कम ग्रापं ने खर्च केली. लिलावात निर्धारित रकमेपेक्षा अधिकची रक्कम अवैध रीतीने घेतल्या गेली,  अशाप्रकारे गाळे बांधकामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आला. या गाळे बांधकामातील भ्रष्टाचारात लिप्त असलेल्या अधिकाऱ्यांवर योग्य ती कार्यवही करण्या करिता पंस स्तरावर चौकशीची मागणी केली होती. यात चौकशी अधिकाऱ्यांनी वस्तूनिष्ठ आणि पारदर्शक तपास न करता भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण देणारा अहवाल सादर केला. त्या विरोधात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी यांचेकडे २०२२ मध्ये फेर चौकशीची मागणी केली. जिल्हाधिकारी कार्यालयात या चौकशी संदर्भात निवेदन दिले. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला निर्देश सुद्धा दिले. तरी सुध्दा या प्रकरणी फेर चौकशी सुरू झाली नाही. नुकतेच जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना स्मरण पत्र दिले आहे. याउपरही फेर चौकशी होताना दिसत नसल्यामुळे २ मार्च ला तहसीलदार चामोर्शी यांना उपोषणाची नोटीस दिली . सदर नोटीसची प्रत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली, संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती चामोर्शी यांना दिली असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.  सदर नोटीशीत जिल्हा पातळीवरून नव्याने चौकशी समिती नेमून भ्रष्टाचारात लिप्त असलेल्या अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाही करण्यात यावी अन्यथा दिनांक ०१ एप्रिल पासून आष्टी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष राहुल डांगे, तसेच  नेमाजी डोंगरे जिल्हा उपाध्यक्ष यांनी दिला आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!