प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या प्रचार रथाचे उद्घाटन

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि २६ जुलै
प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या प्रचार प्रसिध्दीसाठी जिल्ह्यात कृषी रथाला जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्या मार्गदर्शनाखाली अति. जिल्हाधिकारी धनाजी पाटील यांच्या हस्ते हिरवी झंडी दाखवून जनजागृती मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीब, रब्बी हंगाम २०२२ मध्ये राबवण्यासाठी शासनाने मान्यता दिलेली आहे. सदर योजना शासन भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. पीक विमा भरण्याची अंतीम तारीख ३१ जुलै आहे. सदर योजने बाबत व्यापक जनजागृती करण्यासाठी २६ ते ३१ जुलै या कालावधीत कृषीरथाव्दारे तालुका स्तरावरील विमा कंपनीचे तालुका प्रतिनिधी व कृषी विभागाचे क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी विमा योजनेबाबत विस्तृत मार्गदर्शन करणार आहेत, जेनेकरून अधिसूचित ठिकाणचे हवमान घटकांचा प्रतिकूल परिस्थिमूळे नूकसान झाल्यास शेतकऱ्यांना त्याचा मोबदला मिळू शकणार आहे.
सदर कृषी रथाला मंगळवारला जिल्हा स्तरावर हिरवी झंडी दाखवून व्यापक जनजागृती करण्याचे आवाहन संजय मीना जिल्हाधिकारी, धनाजी पाटील अति. जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी केले आहे.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी समाधान शेंडगे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बसावराज मस्तोळी, आत्मा चे प्रकल्प संचालक संदीप कराळे, कृषी उपसंचालक अरुण वसवाडे, तालुका कृषी अधिकारी प्रदिप वाहणे, जिल्हा मृदा सर्वेक्षण अधिकारी गणेश बादाळे, तंत्रअधिकारी सांख्यिकी शितल खोबरागडे, मोहिम अधिकारी डोनाडकर, जिल्हा समन्वयक राकेश बायलालवार, तालुका समन्वयक राहुल नंदनवार, भारतीय कृषी विमा कंपनीचे तालुका समन्वयक शुभम दुधबळे आदी उपस्थिती होते.