क्राईम स्टोरी

डॉ.प्रमोद साळवे विरोधात एट्रासिटीची तक्रार दाखल 

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि.६ मार्च 

चातगाव येथील नर्सिंग संस्थेचे सर्वेसर्वा डॉ. प्रमोद साळवे यांचे विरोधात आरमोरीचे कांग्रेस पक्षाचे कार्यकर्ते छगन शेडमाके यांनी गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये अनुसूचित जाती आणि जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार तक्रार दाखल केली असून डॉ. प्रमोद साळवे यांना अटक करावी अशी मागणी केली आहे.

तक्रारकर्ते छगन शेडमाके

आरमोरी तालुक्यातील कटेझरी येथील राईस मिल खरेदी विक्री च्या वादात डॉ.साळवे आणि पटोले यांच्या एकमेकांविरुद्ध तक्रारी दाखल करण्यात आल्या असून दोन्ही पक्षांनी एकमेकांविरोधात पत्रकार परिषद घेऊन आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या आहेत.

तक्रारीनंतर डॉ.साळवे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत छगन शेडमाके हे आदिवासी असल्याचे माहित असताना सुद्धा त्यांना गावगुंड संबोधित करुन हिणवले, त्यांचा अपमान केला. त्यामुळे आपण व्यथित झालो, समाजात बदनामी झाली आहे. छगन शेडमाकेंवर आजपर्यंत एकही गुन्हा नोंद झाला नाही. असे असताना डॉ.साळवे, ज्यांचेवर भरपूर गुन्हे दाखल आहेत त्यांनी सभ्य माणसावर गावगुंड असल्याचा आरोप केला. त्यामुळे त्यांचे विरुद्ध एट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यासाठी आपण तक्रार केली असल्याचे शेडमाके यांनी सांगितले.

उल्लेखनीय आहे की छगन शेडमाके हे कांग्रेस पक्षाचे कार्यकर्ते असून सामाजिक कामात नेहमी अग्रेसर असतात. त्यांनी आजपर्यंत अनेक अडचणीत सापडलेल्या लोकांना रोख अर्थसहाय्य, प्रासंगिक मदत, शिक्षणासाठी मदत केलेली आहे. अशा आदिवासी समाजातील सामाजिक कार्यकर्त्याला गावगुंड म्हटल्यामुळे व्यथित झाले आहेत.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!