विशेष वृतान्त

विदर्भ पूर जन आयोगाच्या अहवालावर विधिमंडळात होणार चर्चा

आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून होणार अर्धा तास चर्चा

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि.६ मार्च 

अखिल भारतीय किसान सभेच्या माध्यमातून डॉक्टर श्रीनिवास खांदेवाले यांच्या अध्यक्षतेखाली
प्रदीप पुरंदरे, विजय परांजपे, प्रभाकर कोंडबत्तुनवार,मनिष राजनकर,शुभदा देशमुख, कौस्तुभ पांढरीपांडे, डॉ.ओमप्रकाश कुटेमाटे ,डॉ.गुणवंत तगडपल्लीवाार, जयदीप हार्डीकर,
अशोक थूल,अशोक दगडे,विलास भोंगाडे या सदस्यांनी समन्वयक डॉ.महेश कोपुलवार यांनी स्थापित केलेल्या विदर्भ पूर जन आयोगाने सप्टेंबर ते नोव्हेंबर २०२२ या काळात संपूर्ण विदर्भाच्या पूर परिस्थितीचा आढावा घेऊन त्याचा अहवाल 23 डिसेंबर 2022 रोजी प्रकाशित केला आणि तो राज्य सरकारला पाठविण्यात आला राज्य विधी मंडळाचे सदस्य आमदार चंद्रशेखर बावनकुळे या अहवालावर लक्ष केंद्रित केले असून विधिमंडळात या विषयावर ते अर्धा तास चर्चा घडवून आणणार आहेत. यातून राज्य विधिमंडळामध्ये आयोगाने प्रकाशित केलेला अहवाल चर्चिला जाणार आहे.

WPS Office: Complete office suite with PDF editor

Here’s the link to the file:
https://in.docworkspace.com/d/sIOSJnrqDAeaNlqAG?sa=00&st=0t

Get WPS Office for PC:
https://www.wps.com/d/?from=t 

पूर आयोगाने प्रसिद्ध केलेल्या अहवालाची लिंक

एका क्लिकवर वाचा अहवाल

या अहवालात पूर येण्याची कारणे, त्यामुळे उत्पन्न झालेली बाधा, प्रशासकीय नीती, समन्वयाचा अभाव आणि पूर परिस्थितीवरील उपाययोजना सांगितल्या आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न अधिक अभ्यासपूर्ण आणि प्रभावीपणे या अहवालात मांडले आहेत. पूर्व आणि पश्चिम विदर्भातील काही जिल्ह्यांचा प्रत्यक्ष दौरा करुन स्थानिकांकडून पुराची कारण मीमांसा करण्यात आली यानंतर जलतज्ञ अशोक पुरंदरे आणि सहकारी यांचे मार्फत २२ पानांचा अहवाल 23 डिसेंबर रोजी प्रकाशित केला. विधिमंडळाच्या बजेट अधिवेशनामध्ये पुढच्या आठवड्यात यावर चर्चा घडवून आणली जाणार आहे. विधिमंडळात खाजगी आयोगाच्या अहवालाची दखल घेतली जाणे हे अखिल भारतीय किसान सभेचे मोठे यश मानले जात आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!