जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यावर विनयभंगासह एट्रासीटीचा गुन्हा दाखल
पोलीसांनी आरोपीला केली अटक
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली/ दि.२१ नोव्हेंबर
गडचिरोली जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्याने आपल्या पदाचा गैरवापर करीत त्याच्या कार्यालयीन महिला कर्मचाऱ्याचा सतत तीन दिवस विनयभंग केल्याप्रकरणी गडचिरोली पोलीसांनी महिलेच्या तक्रारीवरून सायंकाळी ६ वाजून ५५ मिनीटांनी विनयभंगासह एट्रासीटीचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. यामुळे जिल्हा परिषद प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. ओंकार अंबप्पकर असे या आरोपीचे नाव आहे.

पोलीसांकडून गुन्हा दाखल करण्यास मोठा विलंब
प्राप्त माहितीनुसार पिडीत महिला ही आपल्या एका नातेवाईकासह सकाळी दहा ते साडेदहा दरम्यान तक्रार घेऊन आली होती. पोलीसांनी साधारणतः अकरा वाजता पासून पिडीतेचे बयान नोंदवणे सुरू केले. मात्र गुन्हा दाखल होईपर्यंत सायंकाळचे सात वाजले. त्यामुळे महीलेच्या संदर्भातील अतिशय गंभीर आरोपावर गुन्हा दाखल करण्यास आठ तासांचा विलंब कां? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
महिलेच्या तक्रारीनुसार ती जिल्हा परिषद गडचिरोली येथे अनुकंपा तत्त्वावर वरिष्ठ सहाय्यक (लेखा) भविष्य निर्वाह निधी या ठिकाणी कार्यरत असुन त्याच विभागात मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी म्हणुन कर्तव्यावर असलेले आरोपी नामे- ओंकार रामचंद्र अंबप्पकर रा. गुलमोहर कॉलोनी गडचिरोली हा पिडीतेस कोणत्या ना कोणत्या कारणावरुन त्याचे कार्यालयात बोलावुन पिडीतेचा नेहमी विनयभंग करीत होता दिनांक १६ ते २० नोव्हेंबर पर्यंत पिडीतेस लेझर काढण्यासाठी चार पाच वेळा कॅबिनमध्ये बोलाविले पिडीता लेझरचे काम करुनदा खवित असताना नमुद आरोपी यांनी पिडीत महीलेस लेझर मधील फायनल झालेल्या प्रस्तावामधील पुर्णर क्कम ही दुरुन वाचुन दाखवु नको मला दिसत नाही, असा बाहाणा करुन पिडीतेचा डावा हात ओढून त्यांचे बसलेल्या खुर्चीजवळ ओढुन पिडीतेचा जबरदस्तीने गालाचा किस घेतला, कमरेत हात टाकुन विनयभंग केला. पिडीतेने प्रतिबंध केला असता आरोपीने पिडीतेचा सीआर खराब करुन, नोकरीवरुन काढुन टाकण्याची धमकी देवुन असहयतेचा फायदा घेवून विनयभंग करीत होता.
त्यामुळे पोलिसांनी ओंकार अंबप्पकर रा. गुलमोहर कॉलोनी गडचिरोली यांचे विरुध्द विविध कलमान्वये व अनु.जा.ज.अत्या.प्रति. अधिनीयम प्रमाणे गुन्हा नोंद करुन तपासात घेतला. गुन्हयातील आरोपी हा लॅन्डमार्क हॉटेल जवळील परीसरात लपुन बसला असल्याची गोपनीय माहीती व तांत्रीक पुराव्याच्या आधारे पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवुन आरोपीस ताब्यात घेवुन गुन्हयात अटक करण्यात आली आहे. आरोपीस उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली प्रणिल गिल्डा हे करीत आहेत.